टू व्हीलर सेक्टरचा स्कूटर सेगमेंटमध्ये १०० सीसी ते १५० सीसी पर्यंतच्या प्रीमियम स्कूटर्स सहज उपलब्ध आहेत. जर तुम्ही १५० सीसी इंजिन असलेली प्रीमियम स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. या सेगमेंटच्या दोन लोकप्रिय स्कूटरची संपूर्ण माहिती जाणून घेता येईल. Yamaha Aerox 155 आणि Aprilia SR 160 या दोन स्कूटर आहेत. स्कूटरच्या किमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत प्रत्येक लहान तपशील दिले आहेत.
Yamaha Aerox 155: यामाह एयरोक्स 155 ही एक मॅक्सी स्कूटर आहे. कंपनीने दोन प्रकारांसह बाजारात लाँच केली आहे. स्कूटरमध्ये १५५ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन असून १५ पीएस पॉवर आणि १३.९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने ब्रेकिंग सिस्टममध्ये फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे संयोजन दिले आहे. मायलेजबाबत, यामाहाचा दावा आहे की, ही स्कूटर ४८.६२ किमीचा मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. यामाह एयरोक्स 155 ची सुरुवातीची किंमत रु. १.३० लाख असून टॉप मॉडेल १.३२ लाख रुपयांपर्यंत जाते.
TVS Radeon vs Hero Passion Pro: किंमत, मायलेज आणि स्टाइलच्या बाबतीत कोण वरचढ? जाणून घ्या
Aprilia SXR 160: अॅप्रीलिया एसएक्सआर 160 ही एक प्रीमियम स्कूटर आहे. कंपनीने बाजारात फक्त एकाच प्रकारासह लाँच केली आहे. स्कूटरमध्ये १६० सीसी सिंगल सिलेंडर इंजिन असून १०.९ पीएस पॉवर आणि ११.६ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक लावले आहेत. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर ४७ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत रु. १.२७ लाख (एक्स-शोरूम) आहे.