Yamaha offering festive discounts : सणासुदीच्या उत्साहात आणखीन भर घालण्यासाठी इंडिया यामाहा मोटार महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी विशेष ऑफर घेऊन आली आहे. यामाहाच्या खास ऑफरमध्ये लोकप्रिय 150cc FZ मॉडेल रेंज आणि 125cc Fi Hybrid स्कूटर्सवर उत्तम फायदे देणार आहे, त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील यामाहा दुचाकी घरी आणण्याची ही बेस्ट वेळ आहे.

जपानी ब्रँडने या ऑफरमध्ये FZ-S Fi Ver 4.0, FZ-S Fi Ver 3.0, FZ Fi वर ७००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आणि ७ हजार ९९९ रुपयांचे डाउन पेमेंट ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यामाहाच्या Fascino 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid वर ४,००० पर्यंतचा कॅशबॅक आणि २ हजार ९९९ रुपयांचे डाउन पेमेंट उपलब्ध आहे.

यामाहाच्या विविध प्रोडक्शन पोर्टफोलिओमध्ये YZF-R3 (321cc), MT-03 (321cc), YZF-R15M (155cc), YZF-R15 V4 (155cc), YZF-R15S V3 (155cc), MT-15 V2 (155cc). आदी प्रीमियम मोटरसायकलचा समावेश आहे.

हेही वाचा…घाई करा! थम्‍स अप स्‍कॅन करून खरेदी करा बाईक; स्पेशल एडिशनसह लाँच झाली Hero MotoCorp ची बाईक

त्याच वेळी, FZ-S Fi Ver 4.0 (149cc), FZ-S Fi Ver 3.0 (149cc), FZ Fi (149cc), आणि FZ-X (149cc) यांसारख्या FZ सीरिजच्या बाईकचा समावेश आहे. याशिवाय Yamaha Aerox 155 व्हर्जन S (155cc), Aerox 155 (155cc), Fascino S 125 Fi Hybrid (125cc), Fascino 125 Fi Hybrid (125cc), RayZR 125 Fi Hybrid (125cc) आणि RayZR Hybrid 155cc) आणि RayZR हायब्रीड 155 सीसी. (125cc) ह्यावरही सवलत मिळत आहे.

फीचर्स :

Yamaha FZ सीरिजमध्ये एअर-कूल्ड, १४९ सीसी, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे; ही मोटार 7,250 rpm वर 12.2 hp ची अमेझिंग पॉवर आणि 5,500 rpm वर जास्तीत जास्त 13.6 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सशी जोडलं आहे, जे मागील चाकांना ऊर्जा देते. तर दुसरीकडे, Yamaha RayZR आणि Fascino 125 Fi Hybrid मध्येसुद्धा एअर-कूल्ड, १२५ सीसी, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 6,500rpm वर 8.2hp अमेझिंग पॉवर आणि 5000 rpm वर जास्तीत जास्त 10.3Nm टॉर्क जनरेट करते.