Yamaha Fascino 125 Fi Hybrid: यामाहाने आपली १२५ सीसी स्कूटर श्रेणी नवीन वैशिष्ट्ये आणि इंजिनसह सादर केली आहे. कंपनीने चार स्कूटरचे अद्ययावत आवृत्ती बाजारात आणली आहे, त्यापैकी एक ‘Yamaha Fascino 125 Fi Hybrid’ आहे. या बाईकची डिझाइन आणि मायलेजमुळे या विभागात मजबूत पकड आहे. जर आपल्याला यामाहा फॅसिनो 125 एफआय हायब्रीड आवडत असेल आणि खरेदी करण्याची याेजना आखत असाल तर या स्कूटरच्या संपूर्ण तपशीलांसह ती खरेदी करण्याची सोपी योजना जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Yamaha Fascino 125 Fi Hybrid किंमत

आम्ही यामाहा फासिनो 125 फि हायब्रीड स्पेशल डिस्क व्हेरिएंटबद्दल बोलत आहोत ज्याची प्रारंभिक किंमत ८८,७३० रुपये आहे आणि ही किंमत ऑन रोड १,०२,२६२ रुपये होते. ही स्कूटर रोख रक्कमेने खरेदी करण्यासाठी आपल्याकडे १ लाख रुपये बजेट असावा लागतो. पण आपल्याकडे इतके बजेट नसल्यास, काळजीचे कारण नाही, कारण आज आम्ही तुम्हाला फायनान्स योजनेद्वारे केवळ १० हजारांचे सहज डाउन पेमेंट करुन स्कूटर कशी खरेदी करता येईल, याविषयी माहिती देणार आहोत.

(हे ही वाचा : ना डिलिव्हरीचा पत्ता ना किंमत, तरीही Maruti च्या ‘या’ दोन कार खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जमली गर्दी! )

Yamaha Fascino 125 Fi Hybrid फायनान्स प्लॅन

जर आपल्याला हे स्कूटर १० हजारांच्या रकमेत खरेदी करायचे असल्यास ऑनलाईन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरच्या मते, बँक या स्कूटरसाठी ९.७ टक्के वार्षिक व्याज दरासह ९२,२६२ रुपये कर्ज देऊ शकते.

कर्ज जारी झाल्यानंतर, आपल्याला १०,००० रुपयांची डाऊन पेमेंट जमा करावी लागेल आणि त्यानंतर पुढील ३६ महिन्यांत आपल्याला दरमहा २,९६४ रुपये मासिक ईएमआय जमा करावा लागेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yamaha fascino 125 fi hybrid mileage 68 kmpl know the finance plan to buy it by giving 10 thousand pdb