तुम्ही भविष्यात नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. यामाहा मोटर या मोटारसायकल उत्पादक कंपनीने भारतीय बाजारपेठेत Fascino S नावाची नवीन स्कूटर लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या ‘द कॉल ऑफ द ब्लू ब्रँड कॅम्पेन’ अंतर्गत ही स्कूटर लॉन्च केली आहे. Yamaha Fascino S स्कूटरची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती ‘Answer Back’ फीचरसह लॉन्च करण्यात आली आहे. प्रीमियम स्कूटरने यामाहाच्या पोर्टफोलिओमध्ये एक अनोखी भर घातली आहे. खरेदीदार नवीन लॉन्च केलेली स्कूटर मॅट रेड, मॅट ब्लॅक आणि डार्क मॅट ब्लू या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकतात. चला तर मग या नवीन स्कूटरची वैशिष्ट्ये, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्कूटरचे इंजिन काहीसे असे आहे

आम्ही तुम्हाला सांगतो की, Fascino S मॉडेलची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे ‘Answer Back’ फंक्शन. यामाहाच्या मोबाइल ॲप्लिकेशन ‘यामाहा स्कूटर आन्सर बॅक’द्वारे ग्राहक या वैशिष्ट्यांचा वापर करू शकतात. ॲप्लिकेशनमधील ‘रिप्लाय बॅक’ बटण दाबून ड्रायव्हर सहजपणे त्यांची स्कूटर शोधू शकतात. हे ॲप्लिकेशन Google Play Store किंवा App Store वरून सहजपणे डॉऊनलोड केले जाऊ शकते. Yamaha Fascino S स्कूटरमध्ये एअर-कूल्ड फ्यूल इंजेक्टेड १२५cc ब्लू कोअर हायब्रिड इंजिन आहे जे इंजिनला ‘सायलेंट स्टार्ट’ करण्यास मदत करते आणि जबरस्त असा ‘पॉवर असिस्ट’ परफॉर्मन्स देते.

हेही वाचा >> खरेदीसाठी घाई करा! जूनमध्ये मारुतीच्या या कारवर छप्परफाड डिस्काउंट; वाचलेल्या पैशांमधून खरेदी करू शकता दोन एसी

स्कूटरमध्ये जबरदस्त अशी वैशिष्ट्ये

Yamaha Fascino S मॉडेल देखील प्रगत ऑटोमॅटिक स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम (SSS) सह नॉर्मल मोड आणि ट्रॅफिक मोडसह सुसज्ज आहे. जे रायडर्सना कमी इंधन वापरासह आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव देते. स्कूटर लॉन्च प्रसंगी बोलताना, यामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष इशिन चिहाना म्हणाले, “टू-व्हीलर सेगमेंटमधील नवीन ट्रेंडच्या अनुषंगाने ग्राहकांचा विचार यामध्ये केला आहे त्यामुळे Yamaha Fascino S वरील ‘Answer Back’ वैशिष्ट्य आमच्या ग्राहकांना नक्कीच आवडेल.” कंपनीमध्ये यामाहा फॅसिनो एसच्या मॅट रेड आणि मॅट ब्लॅक कलरची किंमत ९३,७३० रुपये आहे तर डार्क मॅट ब्लू कलरची किंमत ९४,५३० रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yamaha fascino s launched with answer back feature 2024 yamaha fascino s launched in india with answer back feature srk