Yamaha Gudi Padwa Offers for Maharashtra Customers : गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाने हिंदू नववर्षाची सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर येणारा हा सण महाराष्ट्रभर आनंदामध्ये साजरा केला जातो. गुढीपाडव्याला सर्व जण पहाटे लवकर उठतात. अंघोळ करून सूर्योदय झाल्यानंतर गुढी उभारतात. तसेच हा शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी नवनवीन वस्तूंची खरेदीसुद्धा केली जाते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने, गाडी, टीव्ही, फ्रीजची खरेदी करणे जणू काही एक परंपराच आहे. तर हेच लक्षात घेऊन विविध कंपन्यादेखील यानिमित्त ग्राहकांसाठी ऑफर्स जाहीर करतात.

तर इंडिया यामाहा मोटरने ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. या शुभप्रसंगी, यामाहाच्या विशेष डील लोकप्रिय १५० सीसी एफझेड मॉडेल रेंजमधील मोटारसायकल आणि १२५ सीसी एफआय हायब्रिड स्कूटर्स खरेदी करणाऱ्यांना फायदे दिले जात आहेत, ज्यामुळे तुमच्या स्वप्नातील गाडी घरी घेऊन येण्यासाठी ही योग्य वेळ आहे.

गुढीपाडवा स्पेशल ऑफर

१. FZ-S Fi आणि FZ-X (१४९cc) या मोटारसायकलवर चार हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि ११ हजार १११ चे कमी डाउन पेमेंटची ऑफर दिली आहे.

२. फॅसिनो १२५ फाय हायब्रिड (१२५ सीसी) स्कूटरवर तीन हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि सहा हजार ९९९ रुपयांपर्यंतचे कमी डाउन पेमेंटची ऑफर दिली आहे.

मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या यामाहाच्या गाड्या

इंडियन मार्केटमध्ये यामाहा मोटर्स YZF-R3 (321cc), MT-03 (321cc), YZF-R15M (155cc), YZF-R15 V4 (155cc), YZF-R15S V3 (155cc), MT-15 V2 (155cc) 155 version S (155cc), एरॉक्स 155 (155cc), फॅसिनो S 125 Fi Hybrid (125cc), फॅसिनो 125 Fi Hybrid (125cc), RayZR 125 Fi Hybrid (125cc),आणि RayZR Street Rally 125 Fi Hybrid (125cc) सारख्या बाईक आणि स्कूटर विकते.

तुमच्या राईडमध्ये उत्साह आणण्यासाठी डिझाइन केलेल्या यामाहाच्या प्रीमियम रेंजमधील मोटारसायकल आणि स्कूटर्स घेऊन मराठी नववर्षाची सुरुवात करा. डिस्काउंटसंबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही यामाहा डीलरशीपबरोबर संपर्क आणि या उत्सवी ऑफरचा लाभ घेऊ शकता.