जापानी टू व्हीलर कंपनी यामाहाच्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. देशातील बहुतांश लोक या कंपनीच्या बाईक वापरताना दिसतात. आता स्कूटरची आवड असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Yamaha Motor India (YMI) ने आपली नवीन अपडेट बाईक देशातील बाजारपेठेत सादर केली आहे. Yamaha ने Aerox 155 चे नवीन Monster Energy MotoGP एडिशन भारतात सादर केले आहे. यामाहाने ही स्कूटर ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) सह नवीन रंगसंगतीमध्ये सादर केली आहे. ही स्कूटर मेटॅलिक ब्लॅक, रेसिंग ब्लू, ग्रे वर्मिलियन आणि सिल्व्हर अशा चार रंग पर्यायांमध्ये आता उपलब्ध आहे. Yamaha Aerox 155 स्कूटरची स्पर्धा भारतीय बाजारात असलेल्या Aprilia SXR 160 शी होणार आहे.

Yamaha Aerox 155 Monster Energy MotoGP Edition इंजिन

अद्ययावत Yamaha Aerox 155 स्कूटरमध्ये सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड १५५cc इंजिन आहे. हे इंजिन ८,००० RPM वर १४.७९ bhp पॉवर आणि ६,५०० RPM वर १३.९ Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या नवीनतम आवृत्तीच्या स्कूटरचे इंजिन OBD-2 मानकांशी सुसंगत आहे. ही स्कूटर E20 इंधनावर म्हणजेच २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोलवर चालते. ट्रान्समिशनसाठी इंजिनसोबत CVT जोडले गेले आहे. अद्ययावत स्कूटर यामाहाच्या व्हेरिएबल व्हॉल्व्ह अॅक्ट्युएशन (VVA) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
petrol diesel price today in marathi
Price of Petrol And Diesel : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे चेक करा
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून

(हे ही वाचा: मेड-इन-इंडिया Harley च्या सर्वात स्वस्त बाईकची डिलिव्हरी ‘या’ तारखेपासून होणार सुरू, पाहा किती पैसे मोजावे लागणारे )

Yamaha Aerox 155 Monster Energy MotoGP Edition वैशिष्ट्ये

Yamaha Aerox 155 स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आहेत. ब्रेकसाठी, स्कूटरच्या समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम युनिट आहे. सिंगल-चॅनल एबीएस देखील यामध्ये उपलब्ध आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, यामाहाची अपडेटेड स्कूटर एरोक्स 155 मध्ये एलईडी हेडलॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत.

Yamaha Aerox 155 Monster Energy MotoGP Edition किंमत

नवीन स्कूटर 2023 Yamaha Aerox 155 ची एक्स-शोरूम किंमत १.४८ लाख रुपये आहे.