सणासुदीचा काळ लक्षात घेऊन वाहन उत्पादक कंपन्या बाजारात नवनवीन वाहने सादर करत असतात. इतकंच नाही तर ते आधीपासून अस्तित्वात असलेल्या आपल्या वाहनांनाही अपडेट करत असतात. आता सणासुदीच्या काळात यामाहाने दोन नवीन रंग पर्यायांसह Yamaha FZ-S FI V4 सादर केले आहे. नवीन Yamaha FZ-S FI V4 आता डार्क मॅट ब्लू आणि मॅट ब्लॅक पेंट स्कीमसह सादर करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंजिन आणि वैशिष्ट्ये

या बाईकला १४९cc, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे, जे ७,२५०rpm वर १२.४PS पॉवर आणि ५,५००rpm वर १३.३Nm पीक टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS), मागील डिस्क ब्रेकसह सिंगल चॅनल एबीएस, मल्टी-फंक्शनल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाइट, लोअर इंजिन गार्ड आणि ब्लूटूथ सक्षम Y-Connect अॅप यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

(हे ही वाचा : ‘या’ ५ सीटर कारची तुफान मागणी पाहून बाकी कंपन्याची उडाली झोप, मारुतीच्या ३.२ लाख गाड्या वेटिंगवर )

YAMAHA YZF R3 लाँच होणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जपानी दुचाकी निर्माता कंपनी Yamaha आता नवीन 2023 Yamaha YZF R3 भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. हे डिसेंबरमध्ये सादर केले जाऊ शकते. हे एलईडी इंडिकेटर आणि नवीन जांभळ्या रंगाच्या पर्यायासह येऊ शकते.

Yamaha FZ-S FI V4 किंमत

दोन नवीन रंगांसह सादर करण्यात आलेली नवीन FZ-S FI V4 ची किंमत १,२८,९०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yamaha india has launched the fz s fi v4 in two new colours dark matte blue and matte black pdb
Show comments