देशातील दुचाकी क्षेत्रातील प्रीमियम स्पोर्ट्स बाइक बनवणाऱ्या यामाहा मोटरने नवीन वर्षाच्या सुरुवातील लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक यामाहा एफझेड एस नव्या फिचर्ससह लॉन्च केली आहे. स्पेसिफिकेशनसह ग्राफिक बदलही करण्यात आले आहेत. यामाहाने एफझेड एस एफआयच्या नवीन मॉडेलचे नाव Yamaha FZS Fi Dlx असे ठेवले आहे. कंपनीने आपल्या ‘द कॉल ऑफ द ब्लू’ थीम अंतर्गत लॉन्च केले आहे. तरुणाईला लक्षात घेऊन यामाहाने ही बाईक तीन आकर्षक रंगांच्या थीमसह सादर केली आहे ज्यात मेटॅलिक ब्लू, मेटॅलिक डीप रेड आणि सॉलिड ग्रे कलरचा समावेश आहे.या स्पोर्ट्स बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने एक सिंगल सिलेंडर लॉन्च केला आहे. १४९ सीसी इंजिनद्वारे समर्थित आहे. १२.४ पीएस पॉवर आणि १३.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते आणि ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
बाइकच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. यात सिंगल चॅनल एबीएस सिस्टम देण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कंपनीने या बाइकमध्ये ब्लूटूथ आधारित कनेक्ट एक्स अॅप दिले आहे, ज्याद्वारे तुम्ही कॉल आन्सर बॅक, बाइकचे पार्किंग रेकॉर्ड, लोकेट माय व्हेहिकल आणि राइडिंग हिस्ट्री यांसारख्या फिचर्सचा लाभ घेऊ शकता. बाइकमध्ये मल्टी-फंक्शन एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंजिनला सुरक्षित ठेवण्यासाठी खालच्या भागात इंजिन गार्ड अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कंपनीने हेडलाइट आणि टेललाइट एलईडी आकर्षक डिझाइनसह बनवले आहेत. त्यामुळे बाइक अधिक आकर्षक दिसते. तसेच आकर्षक डिझाइन अलॉय व्हील्स तिचा स्पोर्टी लुक वाढवतात.
Royal Enfield Classic 350 VS Honda Hness CB350: किंमत, स्टाइल आणि मायलेजमध्ये कोण वरचढ? जाणून घ्या
बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने ही बाइक १ लाख १८ ९०० रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च केली आहे. तुम्हाला ही बाईक विकत घ्यायची असेल, तर तुम्ही यामाहा मोटरच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ती बुक करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या यामाहा डीलरशिपला भेट देऊन ही बाईक थेट खरेदी करू शकता.