द कॉल ऑफ द ब्लू सीरिज सुरू ठेवत टू व्हीलर निर्माता कंपनी यामाहाने सुपर स्पोर्ट्स बाईक YZF R15S 3.0 साठी नवीन अपडेट जाहीर केले आहे.

कंपनी आता या सुपर स्पोर्ट्स बाईकचे युनिबॉडी सीट व्हेरिएंट मॅट ब्लॅक कलरमध्ये बाजारात आणत आहे. आता ही बाईक रेसिंग ब्लू व्यतिरिक्त मॅट ब्लॅक कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.

कंपनीने YZF R15S 3.0 ही बाईक १, ६०,९०० (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अपडेटबाबत कंपनीचे म्हणणे आहे की, बरेच संशोधन केल्यानंतर ग्राहकांच्या मागणीला प्राधान्य देऊन कंपनीने ही मॅट ब्लॅक कलर स्कीम लॉंच केली आहे.

YZF R15S 3.0 च्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात 155 cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन लिक्विड कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित ४ स्ट्रोक इंजिन आहे जे ४ वाल्व आणि इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित आहे.

या इंजिनमध्ये व्हॉल्व्ह अ‍ॅक्ट्युएशन आणि असिस्ट अॅण्ड स्लिपर क्लच यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन १८.६ PS पॉवर आणि १४.१ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

आणखी वाचा : वाहनांच्या टायर्सचा ‘हा’ नियम बदलला, येत्या १ ऑक्टोबरपासून होणार लागू

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, बाईकच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे.

बाईकच्या फीचर्सबद्दल बोलताना, कंपनीने डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, इंधन गेज, डिजिटल टॅकोमीटर, एलईडी टेल लाइट, टीसीआय, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ऑक्झिलरी लाइट, इंधन वापर इंडिकेटर, शिफ्ट टाइमिंग लाइट, व्हीव्हीए समाविष्ट केले आहे. इंडिकेटर, साइड स्टँड इंजिन कट ऑफ स्विच, ड्युअल हॉर्न, गियर पोझिशन इंडिकेटर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही Yamaha YZF R15S 3.0 ४८.७५ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Story img Loader