स्पोर्ट्स बाईक सेगमेंट हा टू व्हीलर क्षेत्रातील एक लोकप्रिय सेगमेंट आहे जो स्पीडची आवड असलेल्या तरुणांमध्ये सर्वाधिक आवडता आहे. या सेगमेंटमध्ये Hero MotoCorp पासून Bajaj Auto पर्यंत मोठ्या संख्येने बाईक्स आहेत, त्यापैकी एक Yamaha R15S आहे, जी आपल्या स्टायलिश डिझाईन आणि वेगामुळे बाजारात मजबूत पकड राखत आहे.
तुम्हालाही Yamaha R15S आवडत असेल किंवा खरेदी करायची असेल, तर या स्पोर्ट्स बाईकची किंमत, इंजिन, मायलेज आणि सोपा फायनान्स प्लान जाणून घ्या ज्यामध्ये तुम्हाला ही बाईक अगदी कमी डाउन पेमेंटमध्ये खरेदी करता येईल.
Yamaha R15S किंमत
Yamaha R15S कंपनीने बाजारात फक्त एकाच प्रकारासह लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत १,६२,९०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ही किंमत ऑन-रोड झाल्यानंतर १,८७,३६१ रुपये झाली आहे.मायलेजबद्दल, यामाहाचा दावा आहे की R15S एक लिटर पेट्रोलवर 40 किमी मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.
(हे ही वाचा : Maruti-Mahindra चा खेळ संपणार, टाटा आणतेय देशातील सर्वात सुरक्षित कार, सेफ्टीत तडजोड नाही! )
Yamaha R15S Finance Plan
जर तुम्ही ही बाईक रोख पैसे देऊन खरेदी करू शकत नसाल, तर येथे नमूद केलेल्या प्लॅनद्वारे तुम्ही ही स्पोर्ट्स बाईक ३०,००० रुपयांच्या डाउन पेमेंटवर मिळवू शकता. या रकमेसह, बँक या बाईकवर १,५७,३६१ रुपयांचे कर्ज देऊ शकते, ज्यावर वार्षिक ९.७ टक्के दराने व्याज लागू होईल.
Yamaha R15S डाउन पेमेंट आणि मासिक EMI
कर्ज मंजूर झाल्यानंतर Yamaha R15S ला ३०,००० रुपये डाउन पेमेंट करावे लागेल, त्यानंतर पुढील ५ वर्षांसाठी ५,०४१ रुपये प्रति महिना EMI द्यावा लागेल.