Yamaha RayZR 125 Finance Plan: सर्वोत्कृष्ट मायलेज स्कूटर असल्याचा दावा करणार्या स्कूटरची एक लांब श्रेणी बाजारात आहे, ज्यात Hero MotoCorp पासून Honda पर्यंतच्या स्कूटरचा समावेश आहे. सध्याच्या मायलेज स्कूटरच्या श्रेणीमध्ये, आम्ही ज्या स्कूटरबद्दल बोलत आहोत ती यामहा मोटर इंडियाची स्कूटर आहे. या स्कूटरचे नाव ‘Yamaha Ray ZR 125’ आहे, जी अधिक मायलेजचा दावा करते आणि हाय-टेक वैशिष्ट्ये देते. आज आम्ही तुम्हाला Yamaha Ray ZR 125 स्वस्तात डाउन पेमेंटसह कसे खरेदी करता येईल, याविषयी माहिती देणार आहोत.
Yamaha RayZR 125 किंमत
आज आम्ही Yamaha Ray ZR 125 च्या बेस मॉडेलबद्दल बोलत आहोत, ज्याची सुरुवातीची किंमत ८२,७३० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि आॅन रोड ही किंमत ९५,६५४ होते.
(हे ही वाचा : Tata Nexon EV अन् Tiago चा खेळ बिघडणार, ‘या’ कंपनीने आणली आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, रेंज ४५० किमी )
Yamaha RayZR 125 फायनान्स प्लॅन
Yamaha Ray ZR 125 खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९५ हजार रुपयांचे बजेट लागेल, जर तुमच्याकडे इतके बजेट नसेल, तर येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे तुम्हाला ही स्कूटर फक्त १० हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर मिळेल.
ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, तुमचे बजेट १०,००० रुपये असल्यास, बँक या स्कूटरसाठी वार्षिक ९.७ टक्के व्याजदराने ८५,६५४ रुपयांचे कर्ज देऊ शकते.
Yamaha RayZR 125 डाउन पेमेंट आणि EMI
Yamaha Ray ZR 125 वर कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला १०,००० रुपये डाउन पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर बँकेने ठरवल्यानुसार तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला २,७५२ रुपये मासिक EMI भरावे लागेल.