Yamaha Ray ZR Street Rally scooter launch: भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्र हे खूप विशाल आहे, त्यामुळेच फक्त भारतीय नाही तर विदेशी ऑटो कंपनीजसुद्धा या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. आजही भारतात आपल्या अनेक दुचाकी उत्पादक कंपनी पाहायला मिळतात, ज्या आपल्या ग्राहकांच्या अपेक्षेनुसार बाईक मार्केटमध्ये आणत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे यामाहा. सध्याच्या तरुणाईच्या आपल्या बाईक किंवा स्कूटरकडून असणारी अपेक्षा बदलत आहे. आधी टू व्हीलर घेताना फक्त मायलेज या एकाच गोष्टीवर भर दिली जायची, पण आता तरुणांना आपली स्कूटर फक्त मायलेजमध्ये नाही तर लूक आणि कलरमध्येसुद्धा दमदार हवी. यामाहा भारतीय बाजारपेठेत अनेक नवीन गाड्या लाँच करत आहे, त्यापैकी एक Yamaha Ray ZR Street Rally scooter. ही नवीन स्कूटर नवीन कलरमध्ये लाँच केली आहे. चला आपण या स्कूटरचे फीचर्स आणि किंमत जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कलर ऑप्शन –

Yamaha India ने अपडेटेड RayZR स्ट्रीट रॅली लाँच केली आहे, ज्यामध्ये ‘Answer Back’ फंक्शन आणि LED डेटाइम रनिंग लाइट (DRL) आहे. या स्कूटरमध्ये नवीन फीचर्ससोबतच नवीन कलरचाही समावेश करण्यात आला आहे. याला सायबर ग्रीनसारखा नवीन कलर लाँच केला आहे, ज्यात सायबर ग्रीन सोबत आणखी दोन रंग, जसे की Ice Fluo-Vermillion आणि Matte Black हे पर्याय म्हणून देण्यात आले आहेत.

किंमत किती

Yamaha Ray ZR स्ट्रीट रॅली स्कूटर कंपनीने नवीन फीचर्ससह ९८,१३० रुपये (Yamaha Ray ZR स्ट्रीट रॅली स्कूटरची किंमत) एक्स-शोरूम किमतीत लाँच केली आहे.

फिचर्स आणि इंजिन

कंपनीने स्कूटरच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पूर्वीप्रमाणेच यामध्ये FI हायब्रिड तंत्रज्ञानासह १२५ सीसी इंजिन असेल, ज्यामुळे याला ८.२ PS चा पॉवर आणि १०.३ न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. तसेच कंपनीने या स्कूटरमध्ये आन्सर बॅक आणि एलईडी डीआरएलसारखी फीचर्स जोडली आहेत.

हेही वाचा >> Nissan Magnite Facelift: ४ ऑक्टोंबरला भारतात लॉन्च होणार नवी निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट; जाणून घ्या फिचर्स

याव्यतिरिक्त, ब्रश गार्ड, मेटल प्लेट्स आणि ब्लॉक पॅटर्न टायर स्कूटरच्या एकूण डिझाइनमध्ये भर घालतात. यात सीटखाली २१ लीटर स्टोरेज, टेलिस्कोपिक सस्पेंशन, साइड स्टँड इंजिन कट ऑफ, ऑटोमॅटिक स्टॉप-अँड-स्टार्ट सिस्टम आणि Y-Connect BT कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yamaha rayzr street rally with updated features launched in india cooter launch in india with new color option check details srk