यामाहाने आपल्या एका एन्ट्री लेव्हल स्पोर्ट बाईकच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. यामाहा मोटर इंडियाने लोकप्रिय YZF-R15 V4 या बाईकच्या किंमतीमध्ये चौथ्यांदा वाढ केल्याने चाहत्यांना आता ही दमदार बाईक घेण्यासाठी आणखी खिसा सैल करावा लागणार आहे. बाईकच्या किंमतीमध्ये ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
या आधी एप्रिल, ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात या बाईकची किंमत वाढण्यात आली होती. किंमत वाढण्या व्यतिरिक्त बाईकमध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाही.
(हिवाळ्यात कार सुरू केल्यानंतर लगेच चालवू नका, इंजिनवर होईल वाईट परिणाम, ‘या’ टीप्स फॉलो करा)
बाईकची नवी किंमत पुढील प्रमाणे आहे.
१) यामाहा आर १५ एम – १,९१,८००
२) यामाहा आर १५ मोटो जीबी एडिशन – १,९२,४००
३) यामाहा आर १५ रेसिंग ब्ल्यू – १,८४,४००
४) यामाहा आर १५ ब्लॅक – १,८०,४००
५) यामाहा आर १५ रेड – १,७९,४००
६) यामाहा आर १५ सिलव्हर – १,९०, ४००
यामाहा वायझेडएफ – आर १५ व्ही ४ ही बाईक स्पोर्ट सेगमेंटमध्ये बरीच लोकप्रिय आहे. एका दशकापूर्वी ती लाँच झाली होती, त्यानंतर तिच्यामध्ये भरपूर बदल करण्यात आले. यामध्ये डिजाईन, तंत्रज्ञान, इंजिनमध्ये सुधार इत्यादींचा समावेश आहे.
(ई स्कुटरच्या विक्रीमध्ये मोठी वाढ; ‘या’ कंपनीने केला नवा विक्रम)
हे आहेत फीचर्स
बाईकमध्ये एलईडी इल्युमिनेशन, डिजिटल डिस्प्ले, एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल आणि क्विक शिफ्टर देण्यात आले आहे. बाईकमध्ये १५५ सीसी लिक्विड कुल इंजिन देण्यात आले आहे जे ४७ बीएचपीची शक्ती आणि ५२ एनएमचा टॉर्क निर्माण करते. हेच इंजिन आगामी सुपर मेटिओर ६५० बाईकमध्येही मिळण्याची शक्यता आहे.