Yamahas First Hybrid Motorcycle : १७ ते २२ जानेवारीदरम्यान ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात देशातील, जगभरातील प्रमुख वाहन उत्पादक नवीन कार आणि बाईक लाँच करतील. या कार्यक्रमात इंडिया यामाहा मोटर (आयवायएम)ने कंपनीच्या ४० वर्षांच्या समृद्ध इतिहासाचा व भविष्यातील तंत्रज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. कंपनीने आपल्या “अस्‍पायरेशन्‍स अनव्‍हील्‍ड” या संकल्पनेतून भारतीय राइडर्सच्या उत्साही आत्मविश्वासाचा उत्सव साजरा केला आहे.

वायझेडआर-एम१

यामाहा (Yamaha) चे मोटोजीपी मशीन असलेली वायझेडआर-एम१ ग्लोबल एक्स्पोमध्ये प्रमुख आकर्षण बनले. या गाडीने ५०० पेक्षा जास्त पोडियम फिनिशेस आणि चॅम्पियनशिप मिळवून दिली आहे. फॅबिओ क्वार्टारारो आणि एलेक्स रेन्सचे यांचे रायडिंग गियर्स तसेच ऑथेंटिक रेसिंग सूट्स, हेल्मेट्स आणि ग्लोव्ह्ज यामाहाच्या रेसिंग कारकिर्दीला नव्या उंचीवर घेऊन जाते.

Saif ali Khan Attacker attack
Saif Ali Khan : एका पराठ्यामुळे सापडला सैफचा हल्लेखोर; पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? वाचा घटनाक्रम!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Neeraj Chopra Wedding Who is Himani Mor Tennis Player Wife of India Golden Boy
Neeraj Chopra Wife: कोण आहे नीरज चोप्राची पत्नी? टेनिसपटू आणि आता आहे मॅनेजर; अमेरिकेत घेतेय शिक्षण
Vijay Wadettiwar on Guardian Ministers Appointment Postponement
“जिल्ह्याचं पालकत्व हवं की मलिदा?” पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांचा प्रश्न; म्हणाले, “एका रात्रीत…”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
ashish shelar Nawab malik
Nawab Malik : भाजपा नवाब मलिक व सना मलिक यांचा प्रचार करणार? आशिष शेलार म्हणाले, “राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे…”

वाय / एआय कॉन्सेप्ट मोटरसायकल

२०२५ भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये एक खास वाय/एआय कॉन्सेप्ट मोटरसायकल (Y/AI Concept Motorcycle) पाहायला मिळेल. यामाहाची वाय/ एआय कॉन्सेप्ट मोटरसायकल एआय आणि भविष्यासाठीचे डिझाइन करण्यात आली आहे. या मोटरसायकलमध्ये एआय तंत्रज्ञान आणि अद्ययावत डिझाइनचे संयोजन आहे. वायझेडआर-एम१ने प्रेरित डिझाइनसह ही कॉन्सेप्ट बाईक यामाहाच्या भविष्यातील मोबिलिटीचे दर्शन घडवते.

ॲडव्हेंचर मोटरसायकल्स – ब्लेझ न्यू ट्रेल्स

या कार्यक्रमात लँडर २५० आणि नवीन टेनेरे ७०० (Lander 250 and Tenere 700) प्रदर्शित करण्यात आल्या. या शहरी प्रवासासाठी उत्तम आहेत. लँडर २५० ही एक सुंदर दुहेरी उद्दिष्टांसाठी वापरली जाणारी बाईक आहे, ज्यातून तुम्हाला अद्वितीय टिकाऊपणा आणि नियंत्रण मिळते. टेनेरे ७०० ही खऱ्या अर्थाने जागतिक बाईक असून ती तिच्या दणकट डिझाइन, विश्वासू हाताळणी आणि अद्वितीय टिकाऊपणासह अत्यंत कठीण प्रवासांसाठी उत्तम आहे. हे दोन्ही मॉडेल्स एकत्रितरित्या यामाहाची प्रवासाला चालना देण्यासाठी, रायडर्सना आरामदायीपणा आणि नवीन रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी उत्तम आहे.

आर-सीरिज गाड्या

यामाहाचा (Yamaha) रेसिंग डीएनए असणारी ‘आर१५, आर३ आणि आर७’ या आर सीरिज यामाहाच्या सर्वोत्तम मोटरसायकल्सपैकी एक आहे. ती बोल्ड डिझाइनसाठी ओळखली जाते. रायडरची कौशल्ये सुधारण्यासाठी तयार झालेली ही रेंज रायडर्सना अपेक्षेपेक्षाही जास्त वेगाने जाण्यासाठी तयार ठेवते.

एमटी : द डार्क साइड ऑफ जपान

भारत मोबिलिटी ग्‍लोबल एक्‍स्‍पो २०२५ मध्‍ये एमटी-१५, एमटी-०३ आणि एमटी-०९ असलेल्‍या यामाहा एमटी सीरिज दाखवण्यात आल्या. यासह ‘द डार्क साइड ऑफ जपान’मधून प्रेरित या मोटरसायकल्‍स त्‍यांचे टॉर्क-रिच इंजिन्, एगील हॅण्डलिंग, बोल्ड आणि स्ट्रिप्ड डाऊन एस्थेटिक्स तुम्हाला साहसी राइडचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. ही मॉडेल्‍स तुम्‍हाला रात्रीच्‍या वेळी ड्रायव्हिंग करण्‍यास उत्तम आहेत.

यामाहाची भारतातील पहिली हायब्रिड मोटरसायकल: नवीन २०२५ एफझेड-एस एफआय

कंपनीने यामाहाची (Yamaha) भारतातील पहिली हायब्रिड मोटरसायकल – नवीन २०२५ एफझेड-एस एफआय डीएलएक्‍सचेदेखील अनावरण केले. सुधारित हेडलॅम्‍प्‍स, डायनॅमिक टँक स्‍टायलिंग, नवीन कलर स्किम्‍सह यात नवनवीन फीचर्स आहेत, जसे स्‍मार्ट मोटर जनरेटरसह स्‍टॉप / स्‍टार्ट व हायब्रिड तंत्रज्ञान, ज्‍यामधून शांत व स्मूथ इंजिन, कलर टीएफटी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टरसह टर्न-बाय-टर्न (टीबीटी) नेव्हिगेशन तंत्रज्ञान तर फ्यूएल टँकवरील टर्न सिंगल आणि अपडेटेड कलर्स मोटरसायकलच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर घालतात.

हायब्रिड झोनमध्‍ये यामाहाने (Yamaha) आपल्‍या १२५ सीसी एफआय ब्‍ल्‍यू कोअर इंजिनसोबत रेझेडआर, फॅशिनो व फिलानो अशा आपल्‍या लोकप्रिय स्‍कूटर्सची रेंजदेखील दाखवली. स्‍मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) तंत्रज्ञानासह सुसज्‍ज अशा या स्‍कूटर्स इंधन कार्यक्षमता व उच्‍च टॉर्क जनरेट करतात.

जीवनशैलीला कार्यक्षमतेची जोड : ऐरॉक्‍स १५५ आणि एन-मॅक्‍स

ऐरॉक्स १५५ व्‍हर्जन एस आणि एन-मॅक्‍स परफॉर्मन्‍स स्‍कूटर्स तरुण, डायनॅमिक रायडर्सचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. स्‍पोर्टी आकर्षकता, अत्‍याधुनिक इंजिनिअरिंगसह या स्‍कूटर्स शहरी प्रवास आणि वीकेण्‍ड प्लॅनसाठी मस्त ठरणार आहेत.

यामाहाच्‍या (Yamaha) पॅव्हिलियनमध्‍ये ग्राहकांसाठी एक खास कस्टमर झोनसुद्धा असणार आहे, जो चाहत्‍यांना आठवणींचा संग्रह करण्‍यासाठी मोटोजीपी गेमिंग अनुभव, विशेष यामाहा ॲक्‍सेसरीज आणि आर१५ सह टिल्‍ट-बाईक अनुभव देतो. ग्राहक मॉन्‍स्‍टर एनर्जी स्‍टॉलचादेखील आनंद घेऊ शकतात आणि ४० इअर्स एक्‍सक्‍लुझिव्‍ह झोनमधील विविध ॲक्टिव्हिटीत सहभाग घेऊ शकतात.

Story img Loader