Baba Ramdev Spotted Driving Car: बाबा रामदेव पुन्हा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी ते आपल्या कोणत्याही विधानामुळे किंवा योगामुळे नाही तर Land Rover Defender 130 चालवल्यामुळे चर्चेत आले आहेत. ते अलीकडेच ही नवीन एसयूव्ही चालवताना दिसले. ऑटो वारने इंस्टाग्रामवर बाबाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते Land Rover Defender 130 चालवताना दिसत आहेत. गाडीला नंबर प्लेट नाही, त्यामुळे एसयूव्हीचा मालक बाबा रामदेव आहेत की नाही याची पुष्टी झालेली नाही.

बाबा रामदेव यांना Land Rover Defender 130 चालवताना पाहिल्यानंतर जनतेने आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले, हे बाबा नाही, तर भारतातील सतरावा सर्वात श्रीमंत माणूस आहे. तर दुसर्‍याने लिहिले, देशी-देशी बोलून विदेशी कार घेतले बाबा, असंही म्हटलं आहे.

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!

(हे ही वाचा : व्वा भारीच! मारुतीची नंबर-१ फॅमिली कार फक्त ४० हजारात खरेदी करा, मिळेल ३३km पेक्षा जास्त मायलेज )

व्हिडीओ पाहून लोकं म्हणाले, ‘बाबा, देशी-देशी बोलून विदेशी गाडी…?’

बाबा रामदेव करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. काही दिवसांपूर्वी, त्यांनी महिंद्रा XUV700 SUV खरेदी केली होती, ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवर समोर आला आणि व्हायरल झाला. माहितीनुसार, बाबा ज्या लँड रोव्हर डिफेंडर 130 वर स्वार होताना दिसले होते ते कंपनीने फेब्रुवारी २०२३ मध्ये भारतात सादर केले होते आणि अलीकडेच त्याची डिलिव्हरी सुरू झाली आहे.

त्यात बसवलेले इंजिन अतिशय मजबूत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे भारतीय बाजारपेठेत दोन इंजिन प्रकारांसह येते. पहिले म्हणजे ३.०-लिटर पेट्रोल इंजिन (P४००) जे ३९४ bhp पॉवर आणि ५५० Nm टॉर्क जनरेट करते. तर ३.०-लिटर डिझेल इंजिन (D३००) इंजिन येते, जे २९६ bhp पॉवर आणि ६०० Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिन सौम्य-संकरित तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत, आणि ८-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत.

Land Rover Defender 130 किंमत किती आहे?

बाबा रामदेव यांनी चालविलेल्या Land Rover Defender 130 गाडीची सुरुवातीची किंमत १.३ कोटी रुपये एक्स-शोरूम आहे, जी प्रीमियम प्रकारासाठी १.४१ कोटी रुपयांपर्यंत जाते.