Yulu launches Wynn its first E-scooter: ऑनलाइन इलेक्ट्रिक स्कूटर एग्रीगेटर युलू (Yulu) ने अलीकडेच त्यांची नवीन इलेक्ट्रिक दुचाकी Yulu Wynn सादर केली आहे. ५५ हजार ५५५ रुपयांच्या introductory किमतीत ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्यामुळे कंपनीने तिची बुकिंगही सुरू केली आहे. ही किंमत introductory आहे आणि मे २०२३ च्या मध्यापर्यंतच लागू असेल, त्यानंतर स्कूटरची किंमत ६०,००० रुपयांपर्यंत वाढेल.

इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग कसे कराल?

Yulu Wynn इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ९९९ रुपयांमध्ये सुरू करण्यात आले आहे, जे पूर्णपणे परत करण्यायोग्य आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, कंपनीने अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान देण्याचा दावा केला आहे, ज्यामुळे ही हायटेक इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्त किमतीत आहे.

book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!

Yulu Wynn इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये काय आहे खास?

या स्कूटरची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये उपलब्ध असलेली बॅटरी सबस्क्रिप्शन योजना आहे, ज्यामुळे स्कूटरची किंमत ४० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. या ई-स्कूटरची बॅटरी प्रत्येक महिन्याला काही किंमत मोजून सबस्क्रिप्शनच्या आधारावर खरेदी करता येते. यामध्ये ग्राहकांना बॅटरी चार्ज करण्याची गरज भासणार नाही, तर कंपनीच्या जवळच्या स्वॅपिंग स्टेशनवर पोहोचून ती पूर्णपणे चार्ज झालेल्या बॅटरीने बदलावी लागेल.

(हे ही वाचा : आता कारमध्ये बसून गगन भरारीचा आनंद घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, आली Flying Car, लायसन्सची गरज नाही, किंमत…)

तथापि, ग्राहक स्कूटरचा चार्जर अॅक्सेसरी म्हणून देखील खरेदी करू शकतात. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Yulu Wynn मध्ये पूर्ण एलईडी लाइटिंगसह डिजिटल डिस्प्ले आणि कीलेस लॉक आहे. कंपनी यामध्ये ट्रू-कीलेस तंत्रज्ञान देत आहे, ज्याचा वापर युलू अॅपद्वारे केला जाऊ शकतो. युलूचा दावा आहे की, फॅमिली शेअरिंग तंत्रज्ञान देणारी ही देशातील पहिली इलेक्ट्रिक दुचाकी आहे. या वैशिष्ट्याच्या मदतीने, एकाच कुटुंबातील अनेक लोकांना या इलेक्ट्रिक स्कूटरचा रिमोट अॅक्सेस मिळू शकतो.

कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरला OTA अपडेट्सद्वारे अपडेट करेल, ज्यामध्ये स्कूटरशी संबंधित नवीनतम वैशिष्ट्ये आणि तांत्रिक सुधारणांचा समावेश असेल. Yulu Wynn हे सर्व वयोगटातील लोक सहजपणे ऑपरेट करू शकतात, असे कंपनीचे म्हणणे आहे. ते चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशनची गरज भासणार नाही. तथापि, ते चालविण्यासाठी, कायदेशीर वय १६ वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे.

Yulu Wynn इलेक्ट्रिक स्कूटर डिलिव्हरी भारतात कधी सुरु होणार?

Yulu Wynn चा टॉप स्पीड २५ kmph आहे, तर तिची रेंज ८०-१०० km च्या दरम्यान आहे. कंपनी मे २०२३ च्या शेवटच्या दिवसात भारतात डिलिव्हरी सुरू करेल.