Zen Mobility ही गुरुग्राममधील एक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीने नुकतीच कार्गो थ्री-व्हीलर LEV (Light Electric Vehicle) मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. या तीन चाकी लाइट इलेक्ट्रिक वाहनाचे नाव त्यांनी Zen Micro Pod EV असे ठेवले आहे. हे EV वाहन झेन मोबिलिटी कंपनीने लास्ट-माईल मोबिलिटी सोल्यूशन्ससाठी भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केले आहे. २ वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेले हे इलेक्ट्रिक वाहन प्रति चार्ज १२० किमीपेक्षा जास्त रेंज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Zen Micro Pod EV: वैशिष्टे

Zen Micro Pod EV प्रामुख्याने B2B क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. अनेकजणांनी ऑर्डर करुन ही EV बुक केली आहे असे कंपनीने म्हटले आहे. विविध उपक्रमांमधून आम्हाला प्री-१०,००० Micro Pod EV च्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत असा दावाही कंपनीने केला आहे. दरमहा ९,९९९ रुपये भाडे भरुन कोणालाही ही EV घरी घेऊन जाता होणार आहे. १५० किलोग्रॅम कमाल पेलोड क्षमता असलेल्या R5x आणि R10x या दोन Micro Pod EVs लॉन्च करण्यात आल्या आहेत.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
aitraaz movie seqwel
अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा
Seven stalled projects on track soon speed up land acquisition process in five projects
रखडलेले सात प्रकल्प लवकरच मार्गी, पाच प्रकल्पांतील भूसंपादन प्रक्रियेला वेग
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
Zopu scheme, MHADA developer, MHADA,
‘झोपु’ योजनेत म्हाडा विकासक, पहिल्यांदाच जबाबदारी; चार प्रस्ताव प्राधिकरणाकडे

Zen Micro Pod EV: फीचर्स

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक वाहनामध्ये एक वेगळा कार्गो बॉक्स बसवण्यात आला आहे. या बॉक्समध्ये शेल्फ्स, रेफ्रिजरेटेड बॉक्सेस, ओपन टब यांसारख्या असंख्य गोष्टींचा समावेश आहे. या बॉक्समुळे प्रत्येक ग्राहकाच्या वैयक्तिक गरजा पूर्ण होऊ शकतील. शिवाय सुरक्षिततेसाठी त्यामध्ये लॉकिंग यंत्रणा देखील बसवण्यात आली आहे. तसेच त्यामध्ये Vehicle tracking, Geofencing आणि Remote locking असे अत्याधुनिक फीचर्स पाहायला मिळतात. २ तासांपेक्षा चार्जिंग टाइम असलेली ही EV वापरताना ४ यूनिट Electricity खर्च होते.

आणखी वाचा – दिल्लीनंतर आता ‘या’ राज्यातल्या महिला बसमधून मोफत प्रवास करू शकणार, सरकारची मोठी घोषणा

लॉन्चची घोषणा करताना Zen Mobility चे संस्थापक नमित जैन म्हणाले, “आमच्या कंपनीचे Zen Micro Pod EV भारतामध्ये लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. नव्या नाविन्यपूर्ण, संक्षिप्त डिझाइनच्या बळावर हे इलेक्ट्रिक वाहन EV क्षेत्रामद्ये क्रांती घडून आणेल. या वाहनासाठी आम्ही काही नामांकित कंपन्यांसह भागीदारी केली आहे.”

Zen Micro Pod EV हे वाहन प्रति महिना ९,९९९ रुपये देऊन भाड्यावर घेता येणार आहे.