श्रीनिवास बाळकृष्ण shriba29@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज पोटलीबाबा जाम भडकलाय, मी इकडून तिकडे यायला निघालो आणि वाटेत भूक लागली. आपलं राष्ट्रीय खाणं वडापाव मागितला, तर हिरवी-लाल चटणी लावलेल्या पावामध्ये बटाटावडय़ासोबत पाकातला थंडगोड गुलाबजाम दाबून पिचून दिला. असं वाटतं, याच्या बारशाला मॅगीत केळी टाकून वाटलेली. खरंच, अशा कॉम्बिनेशन करणाऱ्यांना गरुडपुराणात काय शिक्षा असेल?

यावरून आठवलं, तुला माहित्येय का अशी विचित्र जोडी आपणही नेहमीच करत असतो. तिखटासोबत गोड, जसं की पुरणपोळीसोबत मटण रस्सा, गरमसह थंडमध्ये सिझिलग ब्राऊनी.. अशी यशस्वी कॉम्बिनेशन्स प्रत्येक गोष्टीत आहेत. खूप आधीपासून होत आहेत. कारण जिभेला नवनव्या चवी हव्या असतात. चवीच नाही तर कपडय़ातही विचित्र जोडय़ा हिट होतात. कुणाला काय आवडेल ते रणवीर सिंगलाच विचारावं लागेल. आज अशाच चित्रविचित्र कॉम्बिनेशनचं पुस्तक पाहणार आहोत. पुस्तकाचं नाव ‘ए ला रेकाँत्रे’ (साधारण अर्थ : बैठकीला) फ्रेंच लेखिका आणि चित्रकर्ती क्लॉडिन मोरेल.

पुस्तकाला तशी कथेची चव ना ढव. प्रत्येक पुस्तकाला कथा, तात्पर्य, उपदेश हवा अशी अट फक्त मराठी पुस्तकांनाच असते हो! हे पुस्तक म्हणजे मिसळपावाइतकं यशस्वी कॉम्बिनेशन झालं आहे. कसं ते पाहू. यात अनेक प्राणी-पक्षी विनोदी पद्धतीने रेखाटली आहेत. जी एकेकटी पाहूनही मजा येते. नुसतं फरसाण, नुसती उसळ खायला मजा येते तशी. कथा नसली तरी पुस्तकाचा हिरो आहे पुस्तकाचं डिझाइन. पुस्तक उघडल्यावर जनरली आपल्याला डावा आणि उजवा असे दोन भाग दिसतात. पण इथं डाव्या, मध्य आणि उजव्या भागात (फोटोत दिसतायेत तसे) सहा भाग दिसतात. विचित्रचित्र असणारी तीन छोटी पुस्तकेच. त्या प्रत्येक पानावर भिन्न अर्धवट कापलेले शरीर आकार. हे फ्लॅप/ पानं  उघडझाप करून वेगवेगळे प्राणी, पक्षी, माणसं तयार होतात. त्यांच्या त्यांच्यात गंमत आहेच, पण त्यांच्या या कॉम्बिनेशननेही हसू येतं. ते चित्रकाराने दिलेलं रेडिमेड कॉम्बो नसतं तर आपण आपल्या हातांनी बनवत असतो. तो प्रत्येक जीव आपलं आपण जन्माला घालतो. काही वास्तवातील तर बरेचदा कल्पनेतील आकार घडत जातात. अशा आकाराचे प्राणी असू शकतात किंवा असले तरी चालतील अशी गंमत हे पुस्तक देऊ करतं. कितीही छोटा किंवा मोठा प्राणी असला तरी त्याचे पोट जिथे जुळतं ते मापात असेल अशी काळजी डिझायनर – चित्रकाराने घेतलीये. त्यामुळे कल्पनेला चांगला आधार मिळतो. हे सर्व चांगल्या पिंट्ररने प्रत्यक्षात छापून आणलं आहे. नाहीतर पुस्तक फसलं असतं. तर मिसळ छान जमलीये. चाखायची असेल तर हे नाव सर्च करून यूटय़ूबवर छोटीशी क्लिप पाहता येईल.

असेच एक्सेल शेफलर्स या लेखक चित्रकाराने फ्लिप फ्लॅप फार्म, फ्लिप फ्लॅप फ्रोजन असे  प्राण्यांचे धड-पाय वेगवेगळे लावून पुस्तके बनवली आहेत. एका प्राण्याला दुसऱ्याचे पाय येत जातात. आणि शेपूट आणखी भलतेच.

अशा कल्पना पोटलीबाबाच्या डोक्यातही असतात रे, पण कदर नाही कुणाला. इतिहासाच्या पुस्तकात अनेकांना दाढी, मिशा, टिकली शेंडी, साडी, ब्लेझर काढला पण.. पण असो. तुम्ही केलाय का असा प्रयोग? बघा की करून! तोवर मी दुसरी मिसळ शोधतो.