साहित्य : खणांचा (चॉकलेटचा) बॉक्स, ग्लिटर पेपर, सॅटिन पट्टी, चॉकलेटचे द्रोण, क्रिस्टल, कात्री, गम.
कृती : जुन्या बॉक्सच्या झाकणाला ग्लिटर कागदाने गुंडाळून त्याला नवा साज चढवा. त्यावर सॅटिनची पट्टी व चॉकलेटचे द्रोण लावून सुशोभित करा.
द्रोणामधील गोलाकारास मागून गम लावून झाकणावर वाटीसारखे चिकटवा. त्यात क्रिस्टलस्ची फुले बनवून द्रोणात चिकटवा.
बॉक्समध्ये खण नसल्यास जाड कार्डपेपरच्या छोटय़ा पट्टया तयार करून त्या खोक्यात चिकटवा. तुमचे खण तयार होतील आणि तुमची दागिन्यांची पेटीही.. अशाप्रकारची दागिन्यांची पेटी तुम्ही तुमच्या मैत्रिणींना भेट देऊ शकता.
काव्यमैफल
संगतसोबत
एकनाथ आव्हाड
पाण्याचा थेंब पडला
तापलेल्या तव्यावर
क्षणात वाफ होऊन
गेला वाऱ्यावर
दवाचा थेंब आला
झाडाच्या पानावर
चकाकत राहिला
मजेत उन्हावर
पावसाचा थेंब शिरला
सागराच्या शिंपल्यात
मोती होऊन बाहेर
आला नव्या रूपात
थेंबाने विचार केला
कुठे बरे जावे?
तव्यावर, पानावर की
शिंपल्यात राहावे?
तुम्हीच सांगा मित्रांनो,
थेंबाला लवकर
कुणाच्या संगतीत त्यानं
राहावं खरोखर?
पक्षी
कोकिळ गातो कुऽऽहू कुऽऽहू
मिळेल सर्वाना आंब्याचा खाऊ
चिमणी करते चिऊ चिऊ
म्हणते बाळाला अंगाई गाऊ
कावळा करतो काव काव
भक्ष्य शोधण्या रचतोय डाव
पोपट म्हणतो मिठू मिठू
पेरू खाण्याची मजा लुटू
सुगरण वीणतो सुबक घरटं
कुटुंबासाठी करतो कष्ट
पावसात भिजून मोर खुलतो
सुंदर पिसांचा पिसारा फुलतो
१) वनस्पतींना भावना असतात, असे सिद्ध करणारा भारतीय शास्त्रज्ञ.
२) ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजमदी दूँगा।’ अशी घोषणा देऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी यांनी ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली.
३) भारताच्या स्वातंत्र्य लढय़ातील काकोरी कटात भाग घेतलेले क्रांतिकारक. हे भगतसिंगाचे गुरू मानले जातात.
४) आर्य चाणक्यांच्या या शिष्याने इसवी सन पूर्व काळात मगध देशाचे सम्राटपद भूषवले.
५) भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे भारताचे पहिले शास्त्रज्ञ.
६) हातातील किंचितशा अपंगत्वाचा वापर फिरकी गोलंदाजीसाठी करून या क्रिकेटरने भारतीय क्रिकेटला सोन्याचे दिवस दाखवले.
७) लाल-बाल-पाल या त्रयीत लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि तिसरे —- होत.
८) ‘अनारकली’, ‘अलबेला’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील सदाबहार गाण्यांचे संगीतकार.
९) अपंगत्वावर मात करून कृत्रिम पायाने उत्कृष्ट नृत्यासाठी गौरवली गेलेली अभिनेत्री.
१०) शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रमुख मंत्री.
११) ‘कोसला’ या कादंबरीने इतिहास निर्माण करणारे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते असे मराठीतील श्रेष्ठ लेखक.
१२) सत्यनिष्ठेसाठी प्रसिद्ध असलेला, प्रभू रामचंद्रांचा पूर्वज असलेला अयोध्येचा राजा.
१३) सर्वाधिक कालावधीसाठी भारताचे सरन्यायाधीशपद भूषविलेले मराठी व्यक्तिमत्त्व.
१४) यांचे ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदेमातरम्’ हे गीत भारताचा मानबिंदू आहे.
१५) ज्ञानाचा सागर असलेले थोर समाजसुधारक. विधवा विवाहाला कायेदशीर मान्यता मिळवून देण्याचे श्रेय यांना दिले जाते.
१६) ‘बंगाल केमिकल्स अॅण्ड फार्मास्युटिकल्स’ ही भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी या प्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञाने स्थापली.
उत्तरे :
१) जगदीशचंद्र बोस २) सुभाषचंद्र बोस ३) चंद्रशेखर आझाद ४)
चंद्रगुप्त मौर्य ५) चंद्रशेखर व्यंकट रामन ६) भागवत चंद्रशेखर ७) बिपिनचंद्र पाल ८) सी. रामचंद्र (रामचंद्र चितळकर) ९) सुधा चंद्रन १०) रामचंद्रपंत अमात्य ११) भालचंद्र नेमाडे १२) राजा हरिश्चंद्र १३) यशवंत विष्णू चंद्रचूड १४) बंकिमचंद्र चटर्जी १५) ईश्वरचंद्र विद्यासागर १६) प्रफुल्लचंद्र रे.
चित्र रंगवा