साहित्य : जुना चॉकलेटचा डबा, रंगीत कागद, कात्री, गम, स्केचपेन, मार्कर्स, पेन्सिल, फुटपट्टी, इ.
कृती : जुन्या चॉकलेटच्या डब्याचा कागद काढून त्याला नवीन रंगीत कागद चिकटवून घ्या. (शक्यतो डबा उघडून मग चिकटवा.) कागद पूर्णपणे वाळल्यावर वरच्या उघडय़ा बाजूस साधारण एक इंचाचे तुकडे वरच्या बाजूस त्रिकोणात कापून मध्यावर दुमडा व चारही दुमडीवर सारख्या अंतराने जोडून ते आतल्या बाजूस दुमडा. सर्व बाजूंना स्केचपेन व मार्करने तुळशीवृंदावनाप्रमाणे रंगवा. सुशोभन करा. डबा खालील बाजूस बंद करा. या डब्यामध्ये तुम्ही छोटीशी पणती लावू शकता, किंवा खऱ्या तुळशीचे रोप लावण्याससुद्धा उपयोग
करता येईल.
आणखी वाचा