साहित्य : केकचा बेस असलेला पुठ्ठा, शर्टाच्या पॅकिंगमध्ये येणाऱ्या पातळ पुठ्ठय़ाचे तुकडे, ४ टुथपिक्स, काळा, सोनेरी, मेटॅलिक अ‍ॅकॅ्रलिक रंग, ब्रश, कात्री, गम, इ.
कृती : केकचा बेस असलेल्या चौकोनी पुठ्ठय़ाला मेटॅलिक रंगात रंगवून घ्या व वाळवा. चित्रात दाखविल्याप्रमाणे किंवा तुम्हाला आवडेल त्या आकारात पातळ पुठ्ठय़ाचे तुकडे व टुथपिक्सचे कोलाज बनवून घ्या व वाळलेल्या बेसवर चिकटवा व योग्य रंगसंगतीत रंगवा. अशा प्रकारच्या कामासाठी तुम्ही टुथब्रशचा वापर करून रंगाचे तुषार उडवूनसुद्धा वेगळा इफेक्ट आणू शकाल. अशा वेगवेगळ्या द्विमितीय कोलाज टाइल्सने तुम्ही आपले टेबल, भिंती, कपाटे सजवू शकता.   

Story img Loader