साहित्य : लाल कागद, काळं स्केचपेन, टिकल्या, गम.
कृती : आकृतीत दाखविल्याप्रमाणे चौकोनी लाल कागदाचा किडा बनवा. डोळ्यांसाठी एका छोटय़ा पट्टीवर दोन अर्धगोल कापून किडय़ाच्या तोंडावर मागील बाजूस चिकटवा. डोळ्यांच्या ठिकाणी टिकल्या चिकटवा किंवा बाजारातून प्लॅस्टिकचे छोटे छोटे डोळे आणून लावता येतील. या लालचुटूक किडय़ाला झाडावर, भिंतीवर, दारावर चिकटवा. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे किडे बनवून खेळू शकता.

Story img Loader