साहित्य : क्रेयॉनचे तुकडे, वॅक्स पेपर, इस्त्री,  मार्कर्स, कात्री.
कृती : क्रेयॉन्सचे तुकडे घेऊन त्यांच्यावरचा कागद काढून टाका. शार्पनरच्या साहाय्याने वा किसणीवर bal01किसून किंवा सुरीने तासून त्यांची पातळ शेव्हिंग्ज् काढा. (तासण्याचं काम मोठय़ांनी किंवा त्यांच्या देखरेखीखाली करावं). रंगांप्रमाणे शेव्हिंग्ज्ची वर्गवारी करा. रद्दी पेपरचा गठ्ठा घेऊन  त्यावर व्ॉक्स पेपर bal08ठेवा. तो मध्यभागी  दुमडा.    त्याचे दोन भाग तयार होतील. पेपरच्या दोन्ही बाजूंना क्रेयॉनचे वेगवेगळ्या रंगांचे शेव्हिंग्ज् एका पातळ थरात पसरा. या पेपर सॅंडविचवर कमी तापलेली इस्त्री दाबून फिरवा. तुम्हाला शेव्हिंग्ज् वितळताना दिसतील. पेपर चांगला थंड झाल्यावर त्यावर तुमच्या आवडीचे चित्र काढा (उदा. फुलपाखरू, सफरचंद) आणि ते कापा. ते चित्र सजवा.  दिव्याच्या प्रकाशात किंवा खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात ही आकृती सुंदर दिसते.     

Story img Loader