साहित्य : साधारण सहा इंची बांबूच्या काडय़ा, लांब लोकर (एकाच रंगाची किंवा तीन-चार वेगवेगळ्या रंगाच्या), कात्री, लाल, निळा, कुठल्याही रंगाचे दोन पर्मनंट मार्कर्स, गम.
कृती : दोन्ही काडय़ांच्या दोन्ही टोकांचा अर्धा इंचाचा भाग मार्करने रंगवा. दोन काडय़ा मधोमध ‘अधिक’ चिन्हासारख्या चिकटवा. चांगल्या घट्ट चिकटल्या की डाव्या हातात त्या धरून उजव्या हाताने मध्यापासून लोकर गुंडाळायला सुरुवात करा. (दोन काडय़ांचे एकूण चार भाग होतात). प्रत्येक काढीला एक वेढा देऊन पुढच्या काडीकडे जा. काढीच्या टोकाचा पाव इंचाचा भाग शिल्लक असताना लोकर गुंडाळणं थांबवा. लोकरीला छोटीशी गाठ मारून उरलेली लोकर कापून टाका.
लोकरीचे गोंडे बांधून, वेगवेगळ्या रंगांची किंवा वेगवेगळ्या जाडीची लोकर, बारीक दोरा वापरून गॉड्स आयमध्ये विविधता आणता येईल.
शशिकला लेले