मुक्ता चैतन्य

दिवाळीची सुट्टी जवळ आली आहे. फराळ, गप्पा झाल्यावर दुपारभर करायचं काय, हा मोठा प्रश्न तुमच्यासमोर असतो. सारखा टीव्ही तरी किती बघणार ना! मला माहीत आहे, तुम्हाला सतत टीव्ही बघायला आवडत नाही, पण इतर काही करण्यासारखं नसलं की तुम्ही टीव्हीसमोर जाऊन बसता. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेय काही मस्त DIY साइट्स.

Boy wrote funny Message behind his bike for Friend funny photo goes viral
PHOTO: “बायकोने मला…” सारखी गाडी मागणाऱ्या मित्रांसाठी पठ्ठ्याने बाईकच्या मागे लिहला जबरदस्त मेसेज; वाचून पोट धरुन हसाल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Boy Dancing With Girl in Rain Friend spoil the moment
“असे मित्र कोणालाही भेटू नये”, भर पावसात मैत्रिणीबरोबर डान्स करत होता तरुण अन् मित्रांनी….Video Viral
Puneri patya viral only punekars know how to make and deal with thief funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंगल्याबाहेर खास चोरांसाठी लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल
Viral Video Of Village
‘अजून एक लाडू बावासाठी… ‘ तुम्ही कधी पंगतीत जेवायला बसला आहात का? मग पाहा गावकडचा ‘हा’ VIRAL VIDEO
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
Viral Video Shows little ones Setup their own shop
चिमुकल्यांचं नवीन दुकान! उद्घाटन केलं, मित्र आले अन्… गावाकडील हा VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे दिवस
You can’t escape Jeevansathi. Delhi Metro is playing matchmaker this wedding season funny video
VIDEO: बाई हा काय प्रकार? अविवाहित प्रवाशांसाठी मेट्रोमध्ये अचानक झाली ‘ही’ अनाऊंसमेंट; ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही

ऊक म्हणजे काय हे तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल, पण काही मित्र मत्रिणींसाठी ही टर्म नवीन असू शकते. तर त्यांना आधी समजावून सांगू या.

DIY म्हणजे Do It Yourself.

आहे की नाही धम्माल! तुम्ही इतर कुणाची विशेष मदत न घेता निरनिराळ्या रोजच्या वापरातल्या वस्तू बनवणं, विज्ञान खेळणी बनवणं.. याला म्हणतात DIY!

इंटरनेटच्या जगात ऊक साइट्स खूप आहेत. युटय़ुबवर आणि किड्स युटय़ुबवरही चिक्कार व्हिडीओज् आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही डायरी, पेन स्टॅन्ड, तुमच्या रोजच्या वापराच्या वस्तूंसाठी ऑर्गनायझर किंवा खेळणी किंवा अजून काहीही बनवू शकता.

पुढल्या वेळी जेव्हा इंटरनेटवर जाल तेव्हा ‘अरविंद गुप्ता’ यांच्या साइटला नक्की भेट द्या. टाकाऊ वस्तूंमधून किती धमाल विज्ञान खेळणी बनवता येऊ शकतात याचा अंदाज नुसतं होम पेज बघितलं तरी तुम्हाला येऊ शकेल.

आता तुम्हाला थोडीशी अरविंद गुप्ता यांची माहिती सांगते.

अरविंद गुप्ता भारतातील वैज्ञानिक खेळण्यांचे प्रचारक आणि प्रसारक म्हणून प्रसिद्ध आहेत. भारत सरकारने नुकतेच त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे. अरविंद गुप्ता हे कानपूर आयआयटीचे माजी विद्यार्थी असून गांधीवादी विचारांचे आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते पुण्यातील आयुका म्हणजेच इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या माध्यमातून मुलांसाठी वैज्ञानिक खेळणी बनवण्याचं काम सातत्याने करीत आहेत.

मुलांना टाकाऊ वस्तूंमधून स्वस्त खेळणी कशी बनवता येतील यासाठी भरपूर युक्त्या आणि सोप्या गोष्टी त्यांच्या वेबसाइटवर आहेत. त्यांच्या साइटवर याच विषयावर त्यांनी लिहिलेली पुस्तक इंग्लिश, हिंदी आणि मराठी अशा तिन्ही भाषांत उपलब्ध आहेत. इतकंच नाही, तर अगणित वैज्ञानिक खेळणी कशी बनवायची याची माहिती आणि विविध भाषांमधले व्हिडीओज् उपलब्ध आहेत. यात उडणाऱ्या खेळण्यांपासून कागदाच्या खेळण्यांपर्यंत आणि टाकाऊ वस्तूंपासून खेळणी ते पझल्सपर्यंत अगणित गोष्टी उपलब्ध आहेत. रोज यातली एक-दोन खेळणी करून बघायची ठरवलीत तरीही त्यात तुमचा चिक्कार वेळ जाईल. शिवाय आपण स्वत: करून बघण्यातली गंमत वेगळीच असते.

मॉलमध्ये जाऊन महागडी खेळणी विकत घेण्यापेक्षा यावेळी DIY !

डू इट यूवरसेल्फ!

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

muktaachaitanya@gmail.com