डॉ. नंदा हरम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साधारणपणे इतिहासात या म्हणीची अनेक उदाहरणं आपल्याला ऐकायला, वाचायला मिळतात. आपली जीवसृष्टीही त्यात मागे नाही. आज आपण एका छोटय़ाशा किडय़ाविषयी जाणून घेऊ या.

या किडय़ाचं नाव आहे ‘बंबार्डीअर बीटल.’ शत्रूवर हल्ला करताना मोठ्ठा आवाज करत गरम रासायनिक फवारा त्यावर मारतो आणि अक्षरश: स्वत:चं नाव सार्थ करतो. या किडय़ाच्या उदरपोकळीत ‘पायजीडिअल’ ग्रंथीची एक जोडी असते. या ग्रंथीचे तीन भाग असतात- पहिला भाग स्रवणारी उती, जिला बऱ्याच घडय़ा असतात. यामुळे तिच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वाढतं. या उतीच्या अस्तरातील पेशी ‘हायड्रोक्विनोन’  आणि ‘हायड्रोजन पेरॉक्साइड’ ही दोन रसायनं स्रवतात. ही अती नलिकेच्या साहाय्याने ग्रंथीच्या दुसऱ्या भागाला म्हणजे साठवण कक्षाला जोडलेली असते. या कक्षाला चांगलं जाड स्नायूंचं आवरण असतं. याच्या पुढचा तिसरा भाग म्हणजे अभिक्रिया कक्ष. या दोन कक्षांच्या मध्ये झडप असते. या कक्षाच्या अस्तरात ‘कॅटलेज’ आणि ‘पेरॉक्सिडेज’ ही दोन विकरं असतात.

किडय़ाला जेव्हा शत्रूची चाहूल लागते, तेव्हा नेमकं काय होतं, ते बघू या. ‘हायड्रोक्विनोन’ आणि ‘हायड्रोजन पेरॉक्साइड’ ही दोन रसायनं उतीकडून साठवण कक्षात जमा झालेली असतात. धोक्याची घंटा वाजताच साठवण कक्षाचे स्नायू आकुंचन पावतात व दोन्ही रसायनं अभिक्रिया कक्षात ढकलली जातात. या कक्षातील कॅटलेज हे विकर पेरॉक्साइडचं विघटन करतं व त्यातून ऑक्सिजन बाहेर येतो. याच ऑक्सिजनच्या साहाय्याने पेरॉक्सिडेज हे विकर हायड्रोक्विनोनचं रूपांतर क्विनोनमध्ये करतं. तयार झालेल्या ऑक्सिजन वायूमुळे अभिक्रिया कक्षात दाब निर्माण होतो व तो कक्ष उघडला जाऊन क्विनोन बाहेर फेकलं जातं. ही अभिक्रिया उष्मादायी असल्यामुळे बाहेर पडणाऱ्या रसायनाचं तापमान १०० अंश सेंटिग्रेड होतं. अभिक्रियेत तयार झालेल्या पाण्याची वाफ तयार होते. अभिक्रिया कक्षातून बाहेर पडणारा हा गरम रसायनांचा फवारा २७० अंश कोनात मारता येईल. अशा तऱ्हेचं या ग्रंथींचं बा छिद्र असतं. या गरम वाफेबरोबरच ऐकू येईल एवढा मोठ्ठा आवाज होतो. यामुळेच या बीटलचं मुंग्या, कोळी, पक्षी, बेडूक अशा शत्रूंपासून बचाव होतो. हा बीटल आकाराने केवढा असतो? तर त्याची लांबी एका इंचापेक्षाही कमी असते. आ वासू नका!

nandaharam2012@gmail.com