साहित्य- टुथपेस्टचे लाल झाकण, अगरबत्ती व काडेपेटीतील वापरलेल्या काडय़ा, हिरवा क्रेप पेपर, हिरवा जिलेटिन पेपर, कात्री, गम, कागदाचा कचरा आणि सेलोटेप, इ.
कृती- टुथपेस्टचे लाल झाकण स्वच्छ धुऊन, पुसून त्यात कागदाचा कचरा भरा. उदबत्ती व काडेपेटीच्या काडय़ांना सेलोटेपने घट्ट बांधून झाडाचा बुंधा व फांद्यांचा सांगाडा तयार करा. त्यावर हिरवा क्रेप पेपर गुंडाळून झाकून सुंदर झाडाचे खोड व फांद्या तयार करा. हिरव्या क्रेप पेपरच्या उरलेल्या कपटय़ांना बुचाच्या आतील कचऱ्यावर चिकटवा व कुंडीत झाड खोवून घ्या. हिरव्या जिलेटीनच्या पट्टय़ा एका बाजूने टोकदार कापा व सेलोटेपच्या साहाय्याने पानांसारखे गुंडाळून छोटे रोपटे तयार करा.
muktakalanubhuti@gmail.com
आर्ट कॉर्नर : रोपटे
टुथपेस्टचे लाल झाकण स्वच्छ धुऊन, पुसून त्यात कागदाचा कचरा भरा. उदबत्ती व काडेपेटीच्या काडय़ांना सेलोटेपने घट्ट बांधून झाडाचा बुंधा व फांद्यांचा सांगाडा तयार करा.
First published on: 09-08-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artificial plants