राज्वी चंद्रकांत पवार

शाळेतून घरी आल्या आल्या अदिती उदास होती.
‘‘काय झालं अदिती? कोणती समस्या उद्भवली आहे?’’
अदितीच्या आईनं तिला विचारलं.
‘‘समस्या म्हणजे काय?’’
अदितीनं चमकून आईला विचारलं.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी

‘‘समस्या म्हणजे प्रॉब्लेम.’’ आईनं पटकन् उत्तर दिलं. अदिती सांगू लागली. आमच्या मराठीच्या बाईंनी एक प्रोजेक्ट दिला आहे. त्यात असे दहा शब्द लिहून आणायचे आहेत, जे आपण रोज इंग्रजीत वापरतो. परंतु त्याचे अर्थ मराठीत लिहून आणायचे आहेत. अदिती इंग्रजी माध्यमात शिकत होती. त्यामुळे तिला ही मोठीच समस्या वाटत होती.
ती आईला म्हणाली, ‘‘माझं मराठी तितकंसं बरं नाही.’’

‘‘अगं, मग शोध असे शब्द. तू रोज जे इंग्रजी शब्द वापरतेस त्याचे अर्थ तुला ठाऊक नसतील ते डिक्शनरीमध्ये शोध. एक तर आत्ताच मिळाला की तुला समस्या म्हणजे प्रॉब्लेम.’’ मग अदितीनं असे शब्द शोधले. त्याचे मराठी उच्चार डिक्शनरीतून शोधून काढले. आणि मग रात्री तिच्या वहीत तिने लिहायला सुरुवात केली. प्रोजेक्ट म्हणजे उपक्रम, डिक्शनरी (शब्दकोश), रुम (खोली), सॉरी (क्षमा), थँक्यू (धन्यवाद), टेलिफोन (दूरध्वनी), टी. व्ही. (दूरचित्रवाणी), कॉम्प्युटर (संगणक), मोबाईल (भ्रमणध्वनी), टेबल (मेज) दुसऱ्या दिवशी अदितीने तिचे शब्द बाईंना दाखविले.
तिचे शब्द तिच्या इतर मित्रमैत्रिणींपेक्षा वेगळे होते. त्यामुळे बाईंनी तिचे विशेष कौतुक केले.
इयत्ता- ७ वी

Story img Loader