प्राची मोकाशी
गेल्या वर्षीची घटना..
‘‘आबा, यंदा २६ जानेवारीच्या झेंडावंदनाचं काय होणारे? ते भाऊराव मदानावर काही करू देतील का आपल्याला?’’ सोहम जरा चिडतच घरी आला आणि त्याने त्याच्या आजोबांकडे तक्रारीचा सूर लावला.
‘‘रविवारी मैदानावर होणाऱ्या मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. तेव्हा त्यांना गाठून आम्ही सगळे ग्राउंड मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य चर्चा करणार आहोत त्यांच्याशी! आपले प्रश्न त्यांच्यापुढे एकदा मांडून तर बघूया! अजून २६ जानेवारीला दहा-बारा दिवस आहेत. पाहूया काय होतंय!’’
‘‘छय़ा! आबा तुम्ही भलतेच आशावादी आहात. मदान बळकावण्याचा त्यांचा इरादा आहे, हे चांगलंच माहीतीये आपल्याला! मग ते आपलं म्हणणं कशाला ऐकतील? आबा, या मैदानामुळेच मी आज बास्केटबॉलच्या नॅशनल्सपर्यंत पोहोचू शकलोय! किती वेळ प्रॅक्टिस करत असतो मी तिथल्या बास्केटबॉल कोर्टवर! हे सगळं कसं विसरू?’’
सोहम राहत असलेल्या ‘मत्र’ कॉलनीचं मदान खरंच खूप मोठं आणि छान होतं- साधारण दोन-तीन एकर पसरलेलं. उपनगराच्या त्या भागांत जवळपास दुसरं मदानही नव्हतं. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांचीच ती आवडती जागा होती! तिथे कुणी क्रिकेट-फुटबॉल खेळत असे तर कुणी वॉकिंग-जॉगिंग करत! कुणाच्या फिटनेस अॅकॅडमी चालायच्या तर नुसतंच तिथल्या बाकांवर बसून गप्पा टाकणारे लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कितीतरी ग्रुप असायचे. सोहमची शाळा कॉलनीच्या अगदी जवळच होती. शाळेला स्वत:चं मैदान नसल्याने पी. टी.चे वर्ग, क्रिकेट-बास्केटबॉलचे प्रशिक्षण, स्पर्धा त्याच मैदानावर होत. गेली अनेक वर्ष हे मदान अशा उपक्रमांसाठी सगळ्यांनाच उपयोगी पडत आलं होतं.
भाऊराव हे स्थानिक नेते गेले बरेच महिने त्या मदानाची जागा बळकावण्याच्या प्रयत्नांत होते. एकतर शहरांत अशा मोकळ्या जागा दुर्मीळ आणि नवी स्कीम आल्यावर आजूबाजूची झाडं पाडली जाणार होती हे तर वेगळंच. म्हणजे उरलीसुरली हिरवळ, त्यात विहार करणारे प्राणी, पक्षी, सुगंध देणारी फुलं, फळं हीसुद्धा सगळी गेल्यातच जमा!
सोहमचे आजोबा भारतीय सन्यदलांतून काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. १९७१ च्या लढाईमध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला होता. त्यांच्या युद्धामधील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्या वेळी २६ जानेवारीला त्यांना सन्मानित केलं होतं. निवृत्तीनंतरसुद्धा स्वस्थ न बसता ते आजही अनेक सामाजिक कार्यामध्ये स्वत:ला झोकून देऊन काम करत होते. वृत्तपत्रांमधून त्यांचे विचार परखडपणे वेळोवेळी मांडत होते.
सन्य दलात भरती झाल्यावर त्यांनीच मैदानाच्या एका कोपऱ्यात ‘ध्वजस्तंभ’ उभारून घेतला होता. तेव्हापासून ते आजतागायत २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला न चुकता मैदानावर ध्वजवंदन होत होतं.
‘‘आबा, जर त्यांनी आपलं ऐकलं नाही तर?’’ सोहम अस्वस्थ होता.
‘‘हे पाहा, बोलण्याने, चच्रेने प्रश्न सुटतात. परस्परांतला संवादाचा पूल कधीच बंद करू नये. आम्ही युद्धात काय करतो? लढाई सुरू असली तरी त्या वेळी ‘पीस-टॉक्स’ही एका बाजूला चालूच असतात. शांततेला पर्याय नाही बेटा. ज्याने युद्ध पाहिलंय त्याला विचारा अिहसेचं महत्त्व! आपण ‘स्टेप-बाय-स्टेप’ जाऊया! बघूया काय होतंय.’’
पण भाऊराव आणि ग्राउंड मॅनेजमेंट कमिटी यांच्यामध्ये घडलेल्या चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही आणि कॉलनीतल्या लोकांमध्ये भाऊरावांच्या विरोधात संताप अजूनच वाढला.
‘‘आबा काय लिहिताय?’’ दुसऱ्या दिवशी दुपारी शाळेतून आल्यावर सोहम पाहतो तर आजोबा त्यांच्या स्टडीमध्ये काहीतरी लिहिण्यात मग्न होते.
‘‘आपल्या कॉलनीच्या मैदानाबाबत समस्या अधोरेखित करणारा लेख पाठवतोय वृत्तपत्राकडे!’’
‘‘मीपण याबद्दल एक लेख लिहिलाय. आज शाळेत लागून दोन फ्री पिरेड मिळाले तेव्हा मी धडाधड काही मुद्दे लिहून काढले आहेत. मैदानाचा विषय डोक्यातून काही केल्या जातच नाहीये! शाळेच्या नोटिस बोर्डवर आम्हाला काही मनातलं, काही आवडलेलं, काही खटकणारं लिहिण्याची ‘स्पेस’ दिलेली असते. मी देऊ का तिथे हा लेख?’’
‘‘हो! जरूर दे!’’ आजोबांनी सोहमचा लेख नीट वाचला. त्यात खटकणाऱ्या काही गोष्टी त्यांनी त्याला दुरुस्त करायला सांगितल्या.
दोघांनी या लढय़ातलं आता पुढचं पाऊल टाकलं होतं.
‘‘आबा, मला आज प्रिन्सिपॉल मॅडमनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं होतं. माझा लेख वाचून त्या रागावल्या आणि म्हणाल्या की ‘नसते उद्योग करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर.’ आणि माझा लेख फाडून टाकला त्यांनी!’’ सोहम रडवेला झाला होता.
‘‘हे होणारच होतं बाळा!’’ सोहमचे बाबा म्हणाले. ते नुकतेच टूरवरून आले होते. आल्यावर त्यांना सोहमच्या आईने आणि आबांनी मिळून घडलेलं सगळं सविस्तर सांगितलं होतं.
‘‘यात माझं काय चुकलं?’’ सोहमला समजत नव्हतं.
‘‘चुकलं तुझं काहीच नाही! पण आपल्या शाळेचे एक ट्रस्टी भाऊरावांचे नातलग आहेत. मग असे लेख छापणं शाळेला कसं परवडेल?’’ आईने समजावलं.
‘‘असं होतं तर तुम्ही मला शाळेत लेख देण्याची मुळात संमतीच का दिलीत?’’
‘‘कसं आहे बेटा, आपला देश हा एक गणतंत्र आहे आणि त्याची राज्यघटना त्यांतील सर्वात महत्त्वाचा घटक! २६ जानेवारी या दिवसाचं मुळी महत्त्वच हे आहे! आपली राज्यघटना सुचवते की ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ हे या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.’’
‘‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे?’’
‘‘म्हणजे व्यक्त होणे. आपला विचार, मत निडरपणे मांडता येणे. आपल्या राज्यघटनेतलं ते एक महत्त्वाचं कलम आहे. आणि हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य सगळ्या नागरिकांना समान आहे. माध्यम कुठलंही असो! ते तुला समजायला हवं म्हणून मी मुद्दामच तुला तो लेख शाळेत द्यायला सांगितला. आपला आवाज कुणी कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी आपण व्यक्त होत राहायचं!’
‘‘अरे, आबांचा लेख तरी कुठे छापून आलाय त्या वृत्तपत्रांत?’’ आजी म्हणाली. या वेळी मात्र सोहमने ‘त’वरून ‘ताकभात’ लगेच ओळखलं आणि तो गप्प झाला.
सोहम आणि आजोबांचा हा प्रयत्नसुद्धा असफल झाला असला तरी दरम्यानच्या काळात भाऊरावांना लढा देण्याचा त्यांचा निर्धार पाहून कॉलनीमधली सगळे लोक एकत्र यायला सुरुवात झाली होती. सगळ्यांनी मिळून आता या लढय़ातलं पुढचं पाऊल टाकलं होतं.
०
नंतरचा रविवार. सोहमच्या घरी ग्राउंड कमिटीचे मेंबर आणि कॉलनीमधली इतर काही मंडळी जमली होती.
‘‘मला वाटतं, आपण ‘मैदान वाचवा’ या आशयाची पत्रकं काढू आणि त्यांचं वाटप करू.’’ सोहमच्या बाबांनी सुचवलं.
‘‘चार-पाच दिवसांवर २६ जानेवारी आहे! तोपर्यंत जमेल तितक्या लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचायला हवा. अगदी फेसबुक, व्हॉट्सअॅपवरूनसुद्धा ही माहिती ‘शेअर’ करू.’’ कमिटीमधले एक ज्येष्ठ सदस्य म्हणाले. सगळ्यांनी एकमताने दुजोरा दिला.
‘‘त्याचबरोबर २६ जानेवारीला ध्वजारोहणाच्या वेळी सगळ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहायला हवं, म्हणजे आपल्यातली एकी भाऊरावांना दिसून येईल.’’ सोहम आवेशाने म्हणाला.
‘‘मी ‘सबर्बन’ नावाच्या एका स्थानिक केबल चॅनलसाठी व्हिडीओ आणि स्पेशल इफेक्टचं काम करते. मी त्यांना विचारते की आपल्या या आंदोलनाला ते ‘कव्हर’ करू शकतील का?’’ जमलेल्यांपैकी एक जण म्हणाली. अशीच काही मुद्दय़ांवर चर्चा झाली आणि मीटिंग बरखास्त झाली.
आता सगळीकडून मदतीचे हात पुढे येत होते. आशेचं चक्र फिरू लागलं होतं.
०
२६ जानेवारीच्या दिवशी सकाळपासूनच लोकांचा ओघ मदानाच्या दिशेने वाढत होता. वाटलेल्या पत्रकांनी आणि सोशल नेटवर्किंगच्या मदतीने हवा तो प्रभाव पाडला होता. ठिकठिकाणी लोक ‘मैदान वाचवा’, ‘पर्यावरण वाचवा’सारखे फलक घेऊन उभे होते. सबर्बन केबल चॅनलची गाडी आंदोलन कव्हर करायला पहाटेपासूनच सज्ज होती.
बरोबर नऊ वाजता ध्वजारोहण झालं. सगळ्यांनी मिळून राष्ट्रगीत म्हटलं. एव्हाना मुलं, मुली, पुरुष, स्त्रिया, आजी, आजोबा – सगळेच एकमेकांचे हात धरून मैदानाभोवती एक साखळी तयार करू लागले होते. ती साखळी होती – एकतेची, निश्चयाची!
लोकांचा हा प्रतिसाद पाहून आजोबा ध्वजस्तंभाशेजारी उभं राहून त्यांच्या छोटय़ाशा भाषणात शेवटी म्हणाले, ‘‘तुमच्या या उपस्थितीने आमचं मनोबल वाढलं आहे. आपला हा आवाज संबंधितांपर्यंत पोहोचेल असा मला विश्वास वाटतो.’’
एवढय़ात त्या साखळीच्या एका भागातून सूर उमटू लागला..
‘‘मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा..’’
आता साखळीतल्या प्रत्येकाचा सूर त्यात मिसळत गेला आणि बघता बघता हा एकतेचा सूर आसमंतात घुमला..
mokashiprachi@gmail.com