मृणाल तुळपुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाताळचा सण जवळ यायला लागला की सगळ्याच लहान मुलांना सांताक्लॉजकडून मिळणाऱ्या भेटवस्तूंची आठवण यायला लागते. छोटा जिमीदेखील त्याला अपवाद नव्हता.

जिमीला नाताळच्या वेळी दोन भेटवस्तू हव्या होत्या. एक म्हणजे लाल रंगाचा मफलर आणि दुसरी म्हणजे आजीकडे राहायला जाताना कपडे नेण्यासाठी छानशी सॅक. या भेटवस्तूंशिवाय त्याला सांताक्लॉजच्या बर्फावरून घसरत जाणाऱ्या गाडीत बसून फिरायचं होतं. जिमीने नाताळच्या आदल्या दिवशी सांताक्लॉजला एक पत्र लिहिलं आणि आपल्या आईला म्हणाला, ‘‘ तू हे पत्र सांताक्लॉजकडे पाठवशील का?’’

आईला जिमीच्या सांताक्लॉजला पत्र लिहिण्याच्या कल्पनेचं खूप कौतुक वाटलं आणि तिने ते पत्र त्याच्याकडून घेतलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी, नाताळच्या दिवशी सांताक्लॉजकडून आवडीच्या भेटवस्तू मिळणार या आनंदात जिमी  झोपायला गेला. त्याला लगेचच गाढ झोप लागली. थोडय़ा वेळाने त्याला घराच्या खिडकीतून दूरवर एक बर्फाचा डोंगर दिसला. डोंगराच्या माथ्यावर सूर्यकिरणं पडली होती. हळूहळू सूर्य वर येत होता आणि सगळीकडचा बर्फ वितळायला लागला होता. जिमीच्या डोळ्यावर सूर्यप्रकाश पडला. त्या उजेडाने त्याने डोळे उघडले. त्याला आजूबाजूला सर्वत्र पाणीच पाणी दिसलं. तो एका छोटय़ाशा बेटावर उभा होता. त्याच्या लक्षात आलं की त्या बेटावर तो एकटाच आहे. तो खूप घाबरला आणि आईकडे घरी जाता येणार नाही या कल्पनेनंच रडायला लागला. इतक्यात आकाशात वीज चमकल्यासारखं काही तरी झालं आणि पांढरी शुभ्र दाढी, लाल कपडे आणि लाल टोपी घातलेला सांताक्लॉज आपल्या घसरगाडीतून त्या बेटावर आला. जिमी रडत रडत त्याला म्हणाला, ‘‘मला घरी आईकडे जायचं आहे.’’

सांताने जिमीचे डोळे पुसले आणि हळूच उचलून त्याला आपल्या घसरगाडीमध्ये बसवलं. काही कळायच्या आत ती गाडी बेटावरून आकाशात झेपावली. आकाशातले चमचमणारे तारे बघून जिमी आपलं रडणं विसरून खुशीत टाळ्या वाजवायला लागला. थोडय़ा वेळानं सांताक्लॉजने आपली  गाडी उंच डेंगरावरच्या बर्फावर उतरवली. तिथे फक्त पंढराशुभ्र बर्फच बर्फ पांघरलेला होता. इतक्या उंच बर्फाच्या डोंगरावर जिमी पहिल्यांदाच आला होता. खाली दिसणारी छोटी छोटी घरं आणि झाडं बघून त्याला मजा वाटली.

सांताक्लॉजने जिमीला दूरवर दिसणारं त्याचं घर दाखवलं आणि म्हणाला, ‘‘आता पहाट व्हायला आली आहे. मला इतर मुलांना त्यांच्या नाताळच्या भेटवस्तू द्यायला जायचं आहे, त्यामुळे मी आता तुला तुझ्या घरी सोडतो.’’

जिमीला घसरगाडीतून िहडायला खूप मजा येत होती. तो आता घरी जायचंही विसरला होता. तो सांताला म्हणाला, ‘‘मला तुझ्या घसरगाडीतून आणखी फिरायचं आहे.’’  ते ऐकून सांताक्लॉज हसला आणि जिमीला डोंगरउतारावरून पाईनच्या झाडांमधून, तळ्याच्या काठावरून फिरवलं. वाटेत रेनडियर्स, पांढरे अस्वल, वॉलरस असे बर्फातले प्राणी दाखवले आणि थोडय़ा वेळानं आपली घसरगाडी जिमीच्या घराशेजारी येऊन थांबवली. त्याने जिमीला गाडीतून उतरवून  त्याच्या पलंगावर नेऊन झोपवलं आणि त्याला नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

सांताक्लॉजला शेकहँड करून त्याचे आभार मानण्यासाठी जिमीने डोळे उघडले तर समोर त्याला त्याची आई दिसली. ती जिमीला नाताळच्या शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्यासाठी त्याच्या खोलीत आली होती.

जिमीने तो सांताक्लॉजबरोबर त्याच्या घसरगाडीतून कसा िहडून आला आणि त्या वेळी कशी मजा आली याचं रसभरीत वर्णन आपल्या आईला सांगितलं. तो इतका खूश झाला होता की, त्याला काय सांगू आणि काय नको, असं झालं होतं.

आईने जिमीला जवळ घेतलं आणि म्हणाली, ‘‘अरे जिमी, तू आता सांगतोस ते तुला पडलेलं स्वप्न होतं. तुझ्या स्वप्नात तू घसरगाडीतून सांताक्लॉजबरोबर चक्कर मारून आला आहेस. म्हणजे तुझी एक इच्छा पूर्ण झाली, आता तुला हव्या असलेल्या या आणखी दोन भेटवस्तू.’’

जिमीने त्या भेटवस्तू उघडल्या. एकात घसरगाडीत बसलेल्या सांताक्लॉजचे चित्र काढलेली सॅक होती आणि दुसऱ्यात लाल रंगाचा मफलर. जिमीने आईला घट्ट मिठी मारून नाताळच्या शुभेच्छा दिल्या. त्याने सांताक्लॉजला लिहिलेल्या पत्रातल्या त्याच्या तिन्ही इच्छा पूर्ण झाल्यामुळे तो अगदी खूश झाला.

आता तो नाताळच्या सुट्टीत लाल रंगाचा मफलर गुंडाळून आणि त्या सॅकमध्ये आपले कपडे घालून आजीकडे राहायला जाणार होता. त्याला आजीला सांताक्लॉजला लिहिलेल्या पत्राबद्दल आणि आपल्या स्वप्नाबद्दल सांगायचं होतं.

mrinaltul@hotmail.com