प्राजक्ता पांगारकर
एका रविवारी सकाळी सावंत आजोबा सोसायटीत सहज चक्कर मारत असताना काही गोष्टी त्यांच्या नजरेस पडल्या. सोसायटी तशी जुनी असली तरी सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारची शिस्त म्हणून नव्हती. कुंड्या कशाही प्रकारे लावल्या गेल्या होत्या. काही ठिकाणी कचरा तसाच पडला होता. मुलांनी सायकली वाटेल तशा लावल्या होत्या. सोसायटीमध्ये असलेल्या गार्डनमधील काही झोपाळे तुटले होते. मोठी माणसं याकडे दुर्लक्ष करतात यावर तोडगा कसा काढायचा, या विचारात असताना त्यांना एक कल्पना सुचली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपल्याला सुचलेल्या कल्पनेवर ते भलतेच खूश झाले आणि त्यांनी लगेच आपल्या नातवाला आणि त्याच्या काही मित्रांना घरी बोलवून घेतलं. त्यांनी सोसायटीच्या आवारात जे बघितलं ते सगळं मुलांना सांगितलं.
हेही वाचा : विळखा काजळमायेचा!
मुलं म्हणाली, ‘‘यात आम्ही काय करणार?’’
तेव्हा सावंत आजोबा म्हणाले, ‘‘अरे, असं कसं. या गोष्टी तर तुम्हीच बघितल्या पाहिजेत आता. यावर उपाय म्हणजे, आपण सोसायटीचा लहान मुलांचा एक मॉनिटर निवडायचा- तोही लहानमुलांनी. या मॉनिटरपदासाठी इच्छुक मुलांनी आपली नावं द्यावीत आणि मुलांनीच मतदान करून मॉनिटर निवडावा.’’
सगळ्या मुलांना ही कल्पना वेगळीच वाटली. सावंत आजोबा म्हणाले, ‘‘मॉनिटर पदासाठी तीन-चार मुलांनी उमेदवार म्हणून उभं राहायचं आणि सोसायटीतल्या सर्व मुलांनीच मतदान करून एकाला निवडून द्यायचं. निवडून आलेल्या मॉनिटरने प्रत्येक मुलाला सोसायटीतली कामं वाटून द्यायची.’’
मॉनिटरपदासाठीचा उमेदवार हा दहा ते बारा वर्षांचा असावा आणि ज्यांना उमेदवार व्हायचंय त्यांनी आजोबांकडे आपली नावे द्यायची असं ठरलं. तसं काही मुलांनी पुढाकार घेऊन आपली नावं आजोबांकडे नोंदवली. शिवाय असंही ठरलं की, दुसऱ्या मुलांना संधी मिळावी म्हणून पुढचे सहा महिने एकदा मॉनिटर झालेल्यानं आपलं नाव उमेदवार म्हणून द्यायचं नाही. यानंतर मतदानाचा दिवस आणि वेळ ठरवण्यात आली. आजोबांनी मॉनिटरपदाच्या कामांची एक यादी तयार केली आणि ही यादी प्रत्येक उमेदवाराला दिली.
हेही वाचा : बालमैफल: अभ्यंगस्नान
मतदानाचा दिवस उजाडला. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अगदी लोकसभा किंवा विधानसभेसाठी जसं मतदान होतं, त्याच पद्धतीनं मतदान करायचं असं ठरलं.
मतदानाच्या ठिकाणी एक खाच असलेला बंद बॉक्स ठेवण्यात आला. मुलांना आपल्याला हवा असलेल्या उमेदवाराचं नाव एका चिठ्ठीमध्ये लिहून आणण्यास सांगितलं आणि प्रत्येकानं आपापली चिठ्ठी त्या बॉक्समध्ये टाकली. मतदानाच्या वेळी जशी बोटाला शाई लावली जाते, तशीच शाई मुलांच्याही बोटाला लावण्यात आली. मतदानाची ही प्रक्रिया फारच सुरळीतपणे आणि खूपच उत्साहाने पार पडली, कारण मुलांसाठी अशा पद्धतीनं मतदान करण्याचा पहिलाच अनुभव होता. त्यानंतर लगेचच मतमोजणी झाली आणि आदित्य सर्वानुमते जिंकून आला.
अशाप्रकारे सोसायटीमध्ये मॉनिटरपदासाठी लोकशाही पद्धतीनं मतदान प्रक्रिया पार पडली आणि मुलांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. त्यांनाही जबाबदारीची जाणीव झाली. मॉनिटरने स्वत:सकट सगळ्या मुलांना कामं विभागून दिली आणि मुलांनीही आपापली कामं करण्यासाठी कंबर कसली. अगदी महिन्याभरातच मुलांनी सोसायटीतील छोट्या-मोठ्या अडचणी सोडवल्या. विशेष म्हणजे एरवी सोसायटीच्या कामासाठी उत्सुक नसलेल्या पालकांनाही या मुलांनी सामावून घेतलं. अशा प्रकारे आजोबांनी मतदानाच्या प्रक्रियेतून सोसायटीतल्या एक महत्त्वाच्या विषयाचा निकाल लावला.
mail2prajaktapangarkar@gmail.com