वर्गाबाहेरच्या मोकळ्या जागेमध्ये उभा राहून समोरच्या पटांगणात चाललेला मुलांचा कबड्डीचा सामना बघण्यात रोहनची अगदी तंद्री लागली होती. किशोर त्याच्या शेजारी येऊन पाच मिनिटं उभा होता तरी त्याच्याकडे रोहनचं लक्ष नव्हतं. शेवटी किशोरने रोहनच्या पाठीत एक जोरदार धपका मारत विचारलं, ‘‘काय माय डियर फ्रेंड! आज लक्ष कुठे आहे तुझं? एवढा कशात मग्न झाला आहेस?’’ या वाक्यानंतर रोहनचं लक्ष किशोरकडे गेलं आणि त्यानं गालात हसत किशोरकडे पाहिलं. किशोरने तोच प्रश्न परत विचारला- ‘‘अरे रोहन! एवढी कसली तंद्री लागली आहे? कसला विचार करतोयस? मी आलो आहे हेही समजलं नाही तुला. नववीच्या मुलांचा कबड्डीचा खेळ पाहण्यात एवढा गुंग झाला आहेस?’’
यावर रोहन हसत म्हणाला, ‘‘अरे, त्यांचा खेळ पाहात होतो आणि बरोबर आजीने सांगितलेला सुखमंत्र आठवत होतो.’’
‘‘आजीचा सुखमंत्र म्हणजे नक्कीच माझ्या खूप उपयोगाचा असणार. सांग तरी मला आजी काय म्हणाली ते?’’

हेही वाचा : झाकीरभाई…

shyam benegal Indian reality
भारतीय वास्तव; वैश्विक दृष्टी…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Narendra chapalgaonkar Sudhir rasal loksatta
लोभस आणि रसाळ!
Hamid is an autobiography
धगधगत्या प्रेमाचं क्रूर वास्तव
chaturang article padsad
पडसाद : समयोचित लेख
lokrang
स्थानिक ते वैश्विक पैस असलेल्या कथा
dr manmohan singh faced challenges in congress
स्वपक्षाने पंख छाटलेला सक्षम पंतप्रधान
architect of economic reforms dr manmohan singh
एका युगाचा अंत

‘‘अरे आजी म्हणाली, आपण नेहमी स्वत:ला आणखी थोडं? असा प्रश्न विचारायचा आणि त्याचं उत्तर आणखी थोडं…, आणखी थोडं! की आणखी थोडं? यांपैकी कोणतं येतं ते पाहायचं. आता बघ ना, या कबड्डी खेळणाऱ्या मुलानं विरोधी संघावर चाल करून गेल्यावर त्यांचा एक गडी बाद केल्यानंतर आणखी थोडं? हा प्रश्न स्वत:ला विचारला तर त्याला उत्तर सापडेल की, आपण पुढे खेळत राहून अजून काही गडी बाद करू शकतो की अजून काही काळ खेळून विरुद्ध संघाच्या खेळाडूंना दमवू शकतो की मी लगेचच आपल्या संघात परतायचं आहे? खेळात काय किंवा जीवनात काय कोणतीही गोष्ट किती मर्यादेपर्यंत करायची आणि कुठे थांबायचं हे समजलं तर खेळ किंवा जीवन नक्कीच यशस्वी होतं.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…

‘‘थोडं थोडं आलं लक्षात.’’ किशोर म्हणाला, ‘‘पण यापुढे प्रत्येक कृती करताना मी नक्कीच आणखी थोडं? असा प्रश्न विचारेन. यापुढची कृती कोणती? अजून किती प्रगती करता येईल? आणि नक्की कुठे थांबायचं? हे आपल्याला समजेल.’’
‘‘बरोब्बर!’’ रोहन म्हणाला.
‘‘अजूनही थोडे थोडे सुखमंत्र सांगत जा बरं मला!’’
‘‘हो. पण, अजून थोडे सुखमंत्र मात्र काही दिवसांनी, कारण आजी गावाला गेलीय सध्या.’’

joshimeghana.23@gmail.com (समाप्त)

Story img Loader