मी सांगलीतल्या पलूस नावाच्या एका छोटयाशा गावात राहते. श्रीनिवास बाळकृष्ण यांचा ‘कागदी ड्रोन’ हा लेख वाचून मला करोनातले दिवस (वाईट नाहीत) आठवले. तेव्हा करोनाची नुकतीच सुरुवात झाली होती. मी तेव्हा ११ वर्षांची होते. करोनामुळे पलूस या माझ्या छोटया गावतही खूप बदल झाले. शाळा बंद होती. शाळा नसल्याने जणूकाही मी चंद्रावरच विहार करत होते. त्या वेळी आम्ही- मी आणि माझी नऊ वर्षांची लहान चुलत बहीण- आमच्या शेजाऱ्यांसोबत खेळायचो. शेजारीही मोजकेच होते. आमच्या घराभोवती बहुतेक शेतं होती! तेथे मोजकीच घरं होती. आम्ही दिवसभर लगोरी खेळायचो. लगोरी खेळण्याचा आमचा सर्वोच्च रेकॉर्ड होता दहा तासांचा! दरम्यान फक्त एक लंच ब्रेक. कधी कधी दिवसभर पतंग बनविण्यात घालवत असू. आमच्या चिमुकल्या हातांनी एक पतंग बनिवण्यास संपूर्ण दिवस जाई. गोंद आणि वर्तमानपत्राचे आयताकृती तुकडे एवढयाच सामानात आमचा पतंग तयार होत असे. पतंग तयार करताना घरात गोंद आणि कागदांचा पसारा असे. दिवसभर बसून पाठ भरून येई. कात्रीने हात दुखत. पाय सुन्न पडत. पण त्याची आम्हाला परवा नसायची. आईला कळू नये म्हणून आमची खोली आम्हीच साफ करत असू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा