रोहनचा डबा उघडताक्षणी किशोरच्या चेहेऱ्यावरचे भाव एकदम बदलले. डब्यात पोहे आहेत, असं ऐकल्यावर तो थोडा नाराज झाला होता, पण डबा उघडल्यावर पोह्यांचा रंग, वास, त्यावर पेरलेलं खोबरं, कोथिंबीर, शेव. ‘आहाहा…’ असं नकळत तो म्हणाला.
‘‘आज आई नाहीय घरी, मामाकडे गेलीय म्हणून आजीकडे डब्याची जबाबदारी.’’ रोहन म्हणाला.

‘‘फर्मास! काय स्पेशल करते आजी यात?’’ किशोरनं विचारलं.
त्यावर रोहन चटकन् म्हणाला, ‘‘मी मन ओतते पदार्थांत असं तीच म्हणते.’’
‘‘मन ओतते?’’ काही न समजून रोहनने आ वासला.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Happy Children's Day 2024
Happy Children’s Day 2024 : जपान आणि भारताची मैत्री कशी झाली? नेहरूंनी टोकियोच्या मुलांना ‘हत्ती’ भेट दिल्याची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला?
Success Story Of Manmohan Singh Rathore
Success Story Of Manmohan Singh Rathore: आईसाठी सोडली सैन्याची नोकरी, एका सहलीने बदललं आयुष्य; वाचा मनमोहन सिंग राठोड यांची परिश्रम अन् समर्पणाची गोष्ट
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद

हेही वाचा…चित्रास कारण की : फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे

‘‘अरे, आजीच म्हणते तसं. म्हणजे बघ हं, आई पोहे करताना सगळे हेच पदार्थ वापरते, पण आजीचे पोहे अप्रतिम होतात. पोहेच कशाला, सगळ्या पदार्थांचं, कामांचं असंच आहे. ‘हे कसं काय?’ असं विचारलं की आजी म्हणते, ‘‘मन ओता.’’
आजी म्हणते, ‘‘अनेक जणांना समान गोष्टी मिळतात, पण ते यशस्वी होतात आणि आनंदी होतात- जे ते काम करताना त्यात मन ओततात.’’
‘‘मीही आजीच्या या बोलण्यावर खूप विचार केला. तुला एक उदाहरण देतो, आपण सगळे मैदानावर खेळतो, पण शुभम अनेक स्पर्धा जिंकतो. कारण तो खेळात आपलं मन ओततो. ऊर्वीकडे आणि आपल्याकडे सारखीच पुस्तकं असतात, पण केलेला अभ्यास तिच्या चांगला लक्षात राहतो, कारण ती अभ्यासात मन ओतते. म्हणजेच अभ्यास मन लावून करते.’’ मग किशोरनंही काही उदाहरणं दिली, म्हणजे त्याला ती आठवली- ज्यांनी ज्यांनी आपापल्या कामात मन घातलं म्हणजेच ती कामे ते मन लावून करतात ती आनंददायी ठरतात. यावरून रोहन आणि किशोर यांनी ठरवलं, या शैक्षणिक वर्षात ज्या ज्या गोष्टी ते करतील त्यात ते आपलं मन ओततील.

हेही वाचा…बालमैफल : वृक्षवल्ली आम्हां सोयरे

‘‘मन लावता येत नसेल तर तासन् तास आणि दिवसेन् दिवस केलेले श्रम निष्फळ ठरतील. पण मन लावून केलेलं अगदी थोडं कामही फलदायी असेल.’’ हे आजीचं वाक्य रोहन सांगत होता आणि किशोर मन लावून ऐकत होता.
joshimeghana.23@gmail.com