प्राची मोकाशी

हॅप्पी न्यू-इयर छोट्या दोस्तांनो! अरे, अरे! असे इकडे-तिकडे काय पाहताय? तुमच्या घराच्या भिंतीवर, दारावर, कपाटावर लावलेल्या किंवा टेबलावर विराजमान झालेल्या माझ्याकडे पाहा… मी कॅलेंडर बोलतोय! तारीख, वार, महिना, साल अचूक सांगणारं कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका. अनादी-अनंत काळाला मानवाने गणिताच्या चौकटीत बसवलंत, ते कॅलेंडर. नवीन वर्षं सुरू होऊन अकरा दिवसच झाले आहेत. पण म्हटलं, नवीन वर्षाच्या दुसऱ्या वीकेंडला तुमच्याशी मनमुराद गप्पा माराव्यात. थोडा उशीर झालाय खरा, पण तरीही… पण त्याआधी सांगा, किती पिझ्झा आणि बर्गर खाल्ले न्यू-इयरच्या पार्टीला? आणि कुडकुड थंडीमध्ये कोल्ड-ड्रिंक्स किती प्यायली? भरपूर नं? तुमच्या वाढदिवसासारखा नवीन वर्षाचाही हा वाढदिवसच. आणि हमखास सुट्टीचा दिवस! कारण बऱ्याच शाळांना नाताळची सुट्टी असते. त्यावरून आठवलं… कधी विचार केलाय, ख्रिसमसला दरवर्षी अनेक भेटवस्तू घेऊन येणारा तुमचा आवडता सांताक्लॉज या भेटवस्तू वाटून झाल्यानंतर काय बरं करत असेल न्यू-इयरला? तर, तोही आपल्यासारखीच धम्माल करतो – ताव मारून जेवतो, बर्फात स्केटिंग-स्कीइंग करतो आणि मस्तपैकी ताणून देतो. मी पाहतो नं दरवर्षी! ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू वाटून तो इतका दमलेला असतो की त्याला थोडी झोप मिळायलाच हवी नं! पण त्यानंतर तो पुन्हा लागतो कामाला- पुढच्या वर्षीच्या ख्रिसमससाठी नवनवीन खेळणी बनवायला. नवीन वर्षं असतंच मुळी नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी!

Rahu Shukra Yuti 2025
१८ वर्षानंतर राहु-शुक्राची युती, या तीन राशींना मिळेल गडगंड श्रीमंती; सुरू होईल सुवर्णकाळ
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
group of friends arranged birthday party for street dog
चर्चा तर होणारच! श्वान लूडोचा ‘असा’ साजरा केला वाढदिवस; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी तरुण मंडळींचे केले कौतुक
Mangal Margi 2025
१८ दिवसानंतर बदलणार ‘या’ तीन राशींचे नशीब, मंगळच्या सरळ चालीमुळे धनाने भरेल झोळी; तुमची रास आहे का नशीबवान?
gajkesari rajyog being formed on 06 febuary 2025 these zodiac sign will be lucky
महाशिवरात्रीच्या आधी निर्माण होतोय गजकेसरी राजयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरू होईल सुवर्णकाळ, मिळेल अपार पैसा अन् पद-प्रतिष्ठा
Chronology Mathematics of time Republic Day independence day
काळाचे गणित: दिवस क्रमांक २४६०७०७
Which festival will be celebrated in February
February Festival 2025: फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या गणेश जयंती, महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग

बरं, न्यू-इयरच्या निमित्ताने तुम्ही बऱ्याच ‘रेझोल्युशन’ केल्यानंतर एव्हाना गाडी मूळ पदावर आलीदेखील असेल. मी पाहतोय नं, काही जण वजन कमी करण्याचं रेझोल्युशन करतात. १ जानेवारीपासून वॉकिंग, जॉगिंग करायचं म्हणून नवीन बूट, ट्रेक-सूट विकत घेतात. पण ते रेझोल्युशन होतं पहिल्याच दिवशी गारद. रात्री उशिरापर्यंत ‘सेलिब्रेट’ केल्यानंतर न्यू-इयरच्या पहिल्याच दिवशी उठतंय कोण? त्यानंतर जो मूड जातो की अजूनही किंमतीचे टॅग न कापलेले नवीन कपडे आणि बूट तसेच कपाटात वाट बघत बसतात आणि जॉगिंग ट्रेक त्यांच्या येण्याकडे डोळे लावून! तीच गत काही ‘अभ्यासू’ मुला-मुलींची. यंदा छान अभ्यास करायचा म्हणून ठरवतात, पण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच उशिरापर्यंत झोपल्याने उत्साह ओसरतो आणि ‘परीक्षा आली की बघू’ असं स्वत:शीच डिक्लेअर करून मोकळे होतात.

आणखी वाचा-सुखाचे हॅशटॅग: आणखी थोडं…

असो. आपण हे न्यू-इयर जे दरवर्षी १ जानेवारीला साजरं करतो, ते साजरं करायची सुरुवात कधी झाली माहित्ये? हल्ली ही भरपूर माहिती इंटरनेटवर सर्च करून लगेच मिळते, तरी सांगतो तुम्हाला संक्षिप्त! नवीन वर्षं साजरं करण्याची सुरुवात येशू ख्रिास्तच्या जन्माच्या तब्बल २००० वर्षं आधीपासूनची. प्राचीन ‘मेसोपोटेमिया’ म्हणजे आताच्या काळातील इराक या देशात सुरू झाली. ‘अकिटू’ नावाचा नवीन वर्षाचा हा सण साधारणपणे मार्च महिन्यात साजरा केला जायचा. ज्या तारखेला दिवस आणि रात्र यांची वेळ समसमान, अर्थात ‘इक्विनोक्स’ ज्या दिवशी असतो त्या दिवशी हा सण साजरा व्हायचा.

मग १ जानेवारी हा न्यू-इयर म्हणून कसा साजरा होऊ लागला याची गोष्ट मोठी रंजक आहे! प्राचीन रोमच्या पहिल्या राजाने, रोम्युलसने स्थापन केलेल्या सर्वांत जुन्या कॅलेंडरची सुरुवात मार्टियस अर्थात मार्च महिन्यापासून झाली. तेव्हाच्या कॅलेंडरमध्ये फक्त १० महिने होते- मार्शियस, एप्रिलीस, माईयस, इयूनियस- अनुक्रमे मार्च, एप्रिल, मे, जून… उरलेल्या सहा महिन्यांना फक्त आकड्यांनी संबोधलं जायचं- सेप्ट म्हणजे सातवा, ऑक्ट म्हणजे आठवा महिना वगैरे. त्यानंतर रोमच्या दुसऱ्या राजाने- नुमा पोम्पिलीयसने माझ्यामध्ये आधी ठरलेल्या ३०४ किंवा १० महिन्यांच्या वार्षिक दिवसांमध्ये ५० दिवस जोडले आणि वर्षाची असमानपणे १२ महिन्यांत विभागणी केली. मग झाले माझे बारा महिने. पण पठ्ठ्याने महिन्यांना आधी दिलेली आकडेवारी मात्र तशीच ठेवली. रोम्युलसच्या कॅलेंडरमध्ये सप्टेंबर सातवा महिना, ऑक्टोबर आठवा, नोव्हेंबर नववा आणि डिसेंबर हा दहावा महिना होता. पण नुमाने दोन महिने अधिक जोडूनही त्या महिन्यांची नावं तशीच ठेवली ती आजतागायत. हा माझा, म्हणजेच तुमच्या कॅलेंडरचा गमतीदार इतिहास.

ही रोमन कॅलेंडर चंद्राच्या संक्रमणावर आधारित होती. मात्र त्यानंतर इ.स. पूर्व ४६ मध्ये रोमन हुकुमशहा ज्युलियस सीझरने त्याकाळच्या खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञांना सूर्यावर आधारित नवीन कॅलेंडर तयार करायला सांगितलं. इ. स. पूर्व ४५ पर्यंत नवीन ‘ज्युलियन कॅलेंडर’ तयार झालं- ज्यात न्यू-इयर अधिकृतपणे १ जानेवारीपासून सुरू झालं. या कॅलेंडरमध्ये दर चार वर्षांनी एक अतिरिक्त दिवस जोडला गेला- ज्याला आपण आता ‘लीप-इयर’ असं म्हणतो. लीप-इयरची संकल्पना सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच २४ तारीख दोन वेळा यायची. सूर्याच्या संक्रमणात होणाऱ्या ६ तासांची फारकत भरून काढण्याकरिता केलेली अॅडजस्टमेंट. त्यानंतर तब्बल १५०० वर्षांनी ज्युलियन कॅलेंडरमधल्या काही त्रुटी तत्कालीन केथलिक चर्चच्या लक्षात आल्यावर पोप ग्रेगरी XIII ने या त्रुटींवर समाधान शोधलं- जे आज जगभर ‘ग्रेगोरियन कॅलेंडर’ म्हणून रुढावलंय. या नवीन कॅलेंडरमध्येही न्यू-इयरची सुरुवात म्हणून १ जानेवारीला मान्यता मिळाली.

आणखी वाचा-बालमैफल: जिंगल बेल… जिंगल बेल…

हे जरी असलं तरी आपले सणवार मात्र आपण हिंदू कालगणनेनुसार साजरे करतो. तुम्ही नीट पाहाल तर बऱ्याच कॅलेंडरवर हिंदू महिने जसं चैत्र, वैशाख, ज्येष्ठ… लिहिलेले असतात. त्याचबरोबर ‘शक’ लिहिलेलं असतं. शक म्हणजे कालगणना पद्धती. हिंदू महिन्यांची नावं त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेच्या मागे-पुढे येणाऱ्या नक्षत्राच्या नावावरून पडलेली आहेत. जसं चित्रा नक्षत्र म्हणून चैत्र महिना, पूर्वाषाढा म्हणून आषाढ, पूर्वा फाल्गुनी म्हणून फाल्गुन महिना वगैरे. या कालगणनेत वर्षं, ऋतू, युग इत्यादींची गणना सौरमानावरून तर महिना, तिथींची गणना चंद्रमानावरून करतात. भारतीय सौर कालगणनेचा पहिला दिवस २२ मार्च आणि लीप वर्षी २१ मार्च असतो. आणि म्हणूनच त्यादरम्यान गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते. विक्रम संवत आणि शालिवाहन शक याच दिवशी सुरू झाले. आपल्या या हिंदू कॅलेंडरप्रमाणे इस्लामिक, चायनीज, बौद्ध, जपानी, पर्शियन ही कॅलेंडरदेखील त्या त्या देशांत ग्रेगोरियन कॅलेंडरबरोबर वापरली जातात.

अशा प्रकारे मी, म्हणजे तुमचं कॅलेंडर अनेक देशांत, विविध काळांत घडत गेलो आणि स्थिरावलो. काळाच्या ओघात माझं रंग-रूपही बदलत गेलं. व्हीन्सेन्झो एकोल्टी नावाच्या रोमन माणसाने पहिलं वहिलं ग्रेगोरियन कॅलेंडर छापील स्वरूपात आणलं. त्यानंतर देव-देवींची चित्रं, देवळांचे पेंटिंग, निसर्गाची नयनरम्य जादू, कालांतराने सिने हिरो-हिरोइनचे फोटो, क्रिकेटर्स आणि विविध स्पोर्टस् सेलेब्रिटींची चित्रं सजवलेल्या मोठ्या, लहान, टेबल-टोप अशा अनेक रूपांत मी तुमच्यापुढे आलो. आणि आता तर ‘अॅप’ स्वरूपांत मी तुमच्या मोबाइलवरही उपलब्ध आहे. भावी वर्षांमध्ये एआयच्या दुनियेत माझ्या स्वरूपामध्ये काय बदल घडतील बघूया…

तर मंडळी, माझ्या या एकतर्फी गप्पा तुम्ही न कंटाळता ऐकल्या, वाचल्या असतील आणि त्या आवडल्या असतील तर त्या कशा वाटल्या हे ‘लाइक, शेअर किंवा सबस्क्राइब’ करण्याऐवजी नवीन वर्षाच्या निमित्ताने एक नवीन डायरी बनवून त्यामध्ये लिहा. लोप पावत चाललेली ही एक चांगली सवय पाहा नवीन वर्षांत अंगवळणी पडते का ते. हो, आणि तुमच्या या डायरीमध्ये पुन्हा मी आहेच… अनादी, अनंत!

mokashiprachi@gmail.com

Story img Loader