मानसचे कुटुंब भारतातून अमेरिकेला जाऊन काही वर्ष झाली होती. मानस त्याच्या आई-बाबांचा एकुलता एक मुलगा होता. तो पाच वर्षांचा होता तेव्हाच त्याच्या आई-बाबांना कामासाठी अमेरिकेला जावं लागलं. मानस हां हां म्हणता केव्हा अमेरिकन झाला ते त्याला आणि त्याच्या आई-बाबांनाही कळलं नाही. जशी बोलण्याची पद्धत अमेरिकन, तसंच वागणंही. अर्थात खाणंही तसंच. भारतातले संस्कार त्याच्यावर फारसे झालेच नव्हते. त्याची आई त्याला लाडानं मन्नू म्हणायची, तर शाळेत तो सगळ्यांचा मॅनी होता. तो एकुलता एक असल्यामुळे त्याचे लाडही खूपच होत होते. लहान असताना एक संपूर्ण खोली त्याच्या खेळण्यांसाठीच होती. तो मोठा होत होता तसं कपड्यांची आणि बुटांची कपाटंही वाढत गेली. सर्व उपभोगायच्या वस्तू लहान वयातच मिळाल्यामुळे मानस थोडा उद्धट होत गेला.

‘‘मनू, चल आईस्क्रीम खायला ये.’’ मानसच्या आईने त्याला हाक मारली.
‘‘पण मॉम, मला चॉकलेट आईस्क्रीम नाही आवडत. मला स्ट्रॉबेरीचं आवडतं. And you know it. Right? ’’
‘‘पण आज आपल्याकडे स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम नाहीए बेटा.’’ मानसची आई म्हणाली.

BJP workers waited four hours for Priyanka Gandhis road show
नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
raj thackeray switzerland incident
“ए आजी तुला बोललो ना…”; राज ठाकरेंनी सांगितला स्वित्झर्लंडमधील भन्नाट किस्सा!
Farmer leader Vijay Javandhia referenced Varhadi poet Vitthal Waghs poem in his comment in nagpur
”आम्ही मेंढर.. मेंढर..पाच वर्षाने होतो, आमचा लीलाव..’’, जावंधियांचे निवडणुकीवर भाष्य
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

हेही वाचा…बालमैफल : सुट्टीतली कमाई

मानसने आईकडून आईस्क्रीमचे बाऊल घेऊन सगळं आईस्क्रीम सिंकमध्ये फेकून दिलं. ते पाहून त्याची आई किंचाळलीच. ‘‘अरे, अरे, काय करतो आहेस तू? फेकतोस काय असं! जगात गरीब मुलांना तर पाहायलासुद्धा मिळत नाही आईस्क्रीम आणि तू फेकतो आहेस? देवा रे देवा! आम्ही कष्ट करून पैसे कमावतो ते असं फुकट घालवायला नाही मन्नू.’’

कोणी काही सांगितलेलं मानस ऐकायचाच नाही. शाळेतून आला की बॅगपॅक टाकून बुटांसकट पलंगावर स्वत:ला झोकून द्यायचा. आईला जेवणाचं टेबल साफ करायला कधीही मदत करत नसे. त्याच्या खोलीत पसाराच पसारा असायचा. मानसचे आई-बाबा त्याला त्याबद्दल रागवायचे, पण तो त्याकडे दुर्लक्ष करायचा.

एक दिवस मानस लवकरच शाळेतून घरी आला. आईने कारण विचारल्यावर म्हणाला, ‘‘आज शाळेत कसलीतरी मीटिंग होती म्हणून लवकर सोडलं.’’ पण थोड्याच वेळात आईला शाळेतून फोन आला तेव्हा कारण कळलं. मानसने गृहपाठ केला नव्हता. त्याच्या शेजारी बसणाऱ्या मेघनकडून तिची वही जबरदस्ती घेऊन तो गृहपाठाची कॉपी मारत होता.

हेही वाचा…बालमैफल : जाणीव

मानसची आई हे ऐकून शरमली. तिला वाटलं, शब्दांच्या मारापेक्षा मुक्याचाच मार बरा म्हणून ती व्हरांड्यात जाऊन गप्प बसली. पण मानसवर त्याचाही परिणाम झाला नाही. त्याच संध्याकाळी मानसला गिटार शिकवायला सर येणार होते. ते मानसच्या खोलीत गेले आणि त्यांना धक्काच बसला. मानस त्यांना आत आलेले पाहून उठला तर नाहीच, पण तोंडाने काहीतरी चघळत गिटारच्या केसवर पाय ठेवून बसला होता. त्याचे हे वर्तन पाहून सर संतापले आणि ते मानसला शिकवायला नकार देऊन निघून गेले.

‘‘मानस कधी रे शिकणार तू? का असं वागतोस? भारतात वाद्यांची पूजा करतात. तुझ्या वाद्यावर तू पाय ठेवून बसतोस!’’ आई रडवेली होऊन म्हणाली. पण मानस पायाने बॉल उडवत अंगणात निघून गेला. त्याच संध्याकाळी मानसच्या आई-बाबांनी त्याला हॉस्टेलवर ठेवायचा निर्णय घेतला. ‘‘हॉस्टेलमध्ये राहिलास की घराची, आई-बाबांची किंमत कळेल तुला. तिथल्या शिस्तीत शिकशील कसं वागायचं ते! आता लाड खूप झाले.’’ बाबा म्हणाले. पण हॉस्टेलमधूनही मानसच्या खूप तक्रारी आल्या. त्याचे आई-बाबा अतिशय दु:खी झाले.

हेही वाचा…बालमैफल : गंधभरल्या गोष्टी

अचानक एक दिवस मानसच्या बाबांची कामानिमित्त टोकियोला बदली झाली. अमेरिकेत वाढलेल्या या उद्दाम मुलाचं टोकियोत कसं होणार या काळजीने मानसचे आई-बाबा चिंतातूर होते. बाबांनी माहिती काढली. ते आईला म्हणाले, ‘‘जपानी लोक खूप शिस्तीचे असतात म्हणे! काहीतरी बरं घडू शकेल मानसच्या बाबतीत.’’

जपानला जाण्याविषयी जेव्हा मानसला कळलं तेव्हा चिडून त्याने खूप गोंधळ घातला. त्याला त्याचे अमेरिकेतील निवांत आयुष्य सोडून टोकियोला जायचं नव्हतं. भाषेचीही अडचण होतीच. पण आई-बाबाच जाणार तर मानसला जाणं भागच होतं.
जपानी लोकांच्या शिस्तीचा फायदा आपल्या व्रात्य मुलाला होईल अशा आशेने मंडळी टोकियोला पोचली. घर मिळेपर्यंत त्यांना हॉटेलातच राहावं लागलं. हॉटेलात त्यांना सांगण्यात आलं की इथे खोलीत चपला-बूट चालत नाहीत. खोलीबाहेर चपला काढायच्या. मानसला त्याच्या आईने तसे कधीही न करण्याबद्दल ताकीद दिली होती. मानसनेही ते च्युईंगम चघळत ऐकलं होतं. दोनचार दिवस नव्या वातावरणात अगदी मजेत गेले. टोकियोतली गर्दी, लगबगीने जाणारा जनसमुदाय, सुशीचा आस्वाद इत्यादी गोष्टी करण्यात वेळ अगदी मस्त गेला.

हेही वाचा…बालमैफल : पुस्तकात रमलेल्या राहुलची गोष्ट!

रविवार आला आणि मानस लवकर उठेना म्हणून आई-बाबा त्याला झोपू देऊन टोकियोत चक्कर मारायला गेले. बाहेर छानपैकी उजाडलं होतं. मानसही उठला आणि खाली नाश्ता करायला गेला. तिथला अमेरिकन नाश्ता करून इकडे तिकडे भटकून वर खोलीत आला आणि पायात बूट तसेच ठेवून हातात मोबाइल घेऊन पलंगावर आडवा झाला. थोड्याच वेळात रूम सर्विसचा माणूस पाण्याची बाटली घेऊन आला आणि त्याने मानसच्या पायात बूट पाहिले. जपानी पद्धतीप्रमाणे कंबरेपर्यंत वाकून त्याने मानसला खोलीत बूट न घालता फिरायची आठवण करून दिली. पण मानसने त्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. रूम सर्विसचा माणूस पुन: मानसपुढे वाकून निघून गेला.

थोड्याच वेळात हॉटेलचा मॅनेजर मानसच्या खोलीत आला आणि त्याने त्याला खोली सोडायला सांगितले. अर्थातच मानसने त्याच्याबरोबर वाद घालायला सुरुवात केली, पण त्याचे त्या मॅनेजरपुढे काही चालू शकले नाही. मानस गुपचूप खाली जाऊन रिसेप्शनमध्ये बसला. मानसचे आई-बाबा फिरून परत आले आणि त्याला तिथे पाहून म्हणाले, ‘‘हाय, नाश्ता केलास का?’’ पण तो त्यावर काहीच बोलला नाही. मॅनेजरने तिथे येऊन त्यांच्यापुढे वाकून अदबीने झाला प्रकार सांगितला.

आई-बाबा ते ऐकून खजील झाले. मानसचे बाबा चांगलेच वरमले आणि त्यांचा चेहरा शरमेने पडला. आई बेचैन झाली. तिचे डोळे भरले. त्यांनी अनेकदा मॅनेजरची माफी मागितली, पण मॅनेजर काही ऐकेना.

हेही वाचा…सुखाचे हॅशटॅग: पूर्णपणे मन ओता..

आपल्या आई-वडिलांच्या झालेल्या अपमानाला आपणच जबाबदार आहोत याची मानसला जाणीव झाली आणि तो खडबडून जागा झाला. आश्चर्य म्हणजे, मानस पटकन उठला आणि मॅनेजरपुढे जपानी पद्धतीने कंबरेपासून वाकून ‘‘गोमेन नासाई’’- (सॉरी) म्हणाला. जणूकाही ‘जपानी झेन’ मधील ‘साटोरी’चा स्पर्शच तो अनुभवत होता. त्याच्यात असा अचानक झालेला बदल पाहून आई-बाबा खूश झाले. मॅनेजरही खूश झाला आणि म्हणाला, ‘‘योकाटाटा.’’

हेही वाचा…चित्रास कारण की : फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे

मॅनेजरने हसून आनंद दर्शवला आणि तो आपल्या कामाला लागला. आपल्या मुलात जपानी संस्कृतीमुळे झालेला बदल पाहून आई-बाबांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
मानस अमेरिकेला परतला तो पूर्णपणे बदललेला होता हे सांगायलाच नको.

(‘साटोरी’ म्हणजे जपानी झेन बुद्धिझममध्ये ‘अचानक झालेली ज्ञानप्राप्ती.’)

vidyadengle@gmail.com