‘‘नंदू, सुगंदी तेल लावून केली का अंगोळ?’’ शेजारची मंगलकाकी नंदूसाठी फराळ घेऊन आली होती.

‘‘तर! आज दिवाळी हाय. उटणं बी लावलं. बाबानं कालंच आनून ठेवलं व्हतं.’’ सकाळचे ९ वाजून गेले होते. नंदूचं नुकतंच सगळं आवरून झालं होतं. आई घरी नसली तरी नंदूनं लवकर उठून अंघोळ केली होती. दर दिवाळीला आई आपल्याला लवकर उठवून तेल, उटणं लावते हे त्याच्या लक्षात होतं.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Srikant Shinde road show in front of Shiv Sena Bhavan to campaign for Sada Saravankar Mumbai
शिवसेना भवनसमोरून सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे यांचा रोड शो; महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी

‘‘आजच्या दिसाला काय गं म्हनत्यात, काकी?’’

‘‘न-र-क-चतुरथी.. चतुर-दशी. आन् आज संध्याकाळी लक्षिमीपूजन. तुजी लक्षिमीबी येनारे आज संध्याकाळला..’’

‘‘काय सांगती काकी! म्हंजी लक्षिमी येनार तर घर छान सजवाया हवं.’’ नंदूनं काकीनं आणलेला फराळ पटापट फस्त केला- चकल्या, चिवडा, मोतीचुराचा लाडू..

‘‘मी जरा भाईर येते जाऊन. काई लागलं तर सांग नक्की,’’ म्हणत काकी तिच्या घरी परतली.

दोन-तीन दिवसांपूर्वी, म्हणजेच वसुबारसेला, नंदूला बहीण झाली होती. तिला पाहताक्षणीच नंदूनं तिचं नाव ठेवलं ‘लक्ष्मी’. त्याची आई सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती होती म्हणून त्याचे बाबा काम-घर-हॉस्पिटल अशी सतत जा-ये करत होते. त्याचे आई-बाबा एका कंस्ट्रक्शन साइटवर मजुरी करायचे. त्याच साइटवर पत्र्याच्या झोपडय़ा बांधून काही कामगार राहायचे. नंदूचंही घर त्यांच्यापैकी एक होतं. एकाच गावातून आल्यामुळे सगळे आधीपासूनच एकमेकांना ओळखायचे.

नंदू लगबगीनं घरात शोधाशोध करू लागला. सगळी बोचकी-गाठोडी त्यानं धुंडाळून काढली; पण ज्या डब्यात आई रांगोळी, रंग वगैरे ठेवते तो डबा काही केल्या त्याला सापडेना. झालेल्या पसाऱ्याकडे तो हताशपणे बघू लागला.

‘‘नेहादीदी सांगती ‘जो घर हो साफ-सुथरा, सुंदर, लक्षिमीजी आती उसके अंदर..’’ म्हणत त्यानं उचकलेलं सामान पुन्हा व्यवस्थित जागेवर लावून ठेवलं. ‘रांगोळी, रंग, पणत्या.. नवीन आणू का? नगं! उगा पैशे काय खर्च करायचे? सुचल काई तरी..’ नंदू नऊ वर्षांचा, पण खूप समजूतदार होता.

बहिणीचं स्वागत करण्यासाठी अजून पर्याय शोधत असताना त्याला एकदम नेहादीदीनं शिकवलेला आकाशकंदील आठवला. नंदूचे आई-बाबा मजूर असल्याने एका साइटचं काम संपलं की त्यांचं बिऱ्हाड दुसऱ्या साइटवर जायचं- त्यांचा सुपरवायजर जिथे पाठवेल तिथे. त्यामुळे नंदूची शाळा सुरळीत होत नव्हती; पण या साइटवर आणि परिसरातल्या इतर काही साइटवर आई-बाबांचं काम सुरू असल्यानं तो गेले वर्षभर तिथेच रहात होता. तिथल्याच एका ब्रिजखाली ‘किलबिल’ एन.जी.ओ.ची नेहादीदी मजुरांच्या मुलांना आठवडय़ातून तीन दिवस शिकवायला यायची. दिवाळीच्या निमित्तानं गेल्या आठवडय़ातच तिनं मुलांना सोपा आकाशकंदील बनवायला शिकवला होता. नंदूचा निळय़ा-जांभळ्या आणि लाल शेपटय़ांचा आकाशकंदील खूप छान झाला होता.

‘‘अरेच्चा! कंदील कसा लावाया इसरलो?’’ त्यानं आकाशकंदील घराबाहेरच्या बल्बवर अडकवला.

‘‘लक्षिमी घरला येईल तवा कंदील तरी लावता येईल. आता रांगोळी, पणत्या काकीकडे मागू का? पर जास्तीच्या आसतील तिच्याकडं? मंग काय करू?’’ असे अनेक विचार करत नंदूला गाढ झोप लागली.. शोधाशोध करून दमल्यामुळे असेल किंवा काकीने दिलेल्या फराळामुळे.. त्याला झोप अनावर झाली होती.. बऱ्याच वेळानं साइटचं गेट उघडण्याच्या आवाजाने नंदूला जाग आली. ‘‘सुपरवायजर आले म्हंजी पाच वाजलं संध्याकाळचं. काकी आली आसंल. जाऊन इचारतो तिला.’’ असं म्हणत नंदूनं घराचं दार उघडलं. तर घराच्या एका बाजूला बुचाच्या पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा पडला होता. त्यानं वर झाडाकडे बघितलं. कालपासून जमिनीकडे झुकलेले फुलांचे घोस आज खाली पडले होते. फुलंही अजून टवटवीत होती. गेल्या वर्षी हे झाड पावसाच्या तडाख्यामुळे उन्मळून पडलं. सगळय़ा कामगारांनी मिळून त्याला पुन्हा उभं केलं. झाडाची ती दशा पाहून नंदूला खूप वाईट वाटलं होतं. तो नित्यनेमानं त्या झाडाला पाणी घालू लागला. जमेल तशी त्याची मशागत करू लागला. वर्षभरात झाड पुन्हा रुजलं आणि आता तर त्याला सुंदर बहरही आला होता. नंदूला कल्पना सुचली. त्यानं बुचाची भरपूर फुलं वेचली. हिरवीगार पानं आणली. दोन्ही एक-आड-एक अशी अर्ध गोलाकारांत रचली. शेजारच्या कम्पाउंडवर बहरलेली लाल-केशरी बोगनवेल नेहमी त्यांच्या साइटच्या भागात पडायची. बुचाच्या प्रत्येक फुलापुढे त्यानं बोगनवेलीची फुलं ठेवली. मग त्याला थोडी बिट्टीची पिवळी फुलंही मिळाली. त्यानं ती अलगदपणे एक-एक पानावर सजवली. असं करत लाल-केशरी, पांढऱ्या, हिरव्या, पिवळय़ा रंगांच्या फुला-पानांची रांगोळी तयार झाली.

‘‘मेणबत्ती, पणत्या सापडल्या आसत्या तर आजून मजा आली आसती. आईनं पणत्या कुटं ठेवल्यात सापडतच न्हाईत..’’ नंदू पुटपुटला तसं त्याच्या हाफ-पँटला ओढ बसली. वळून पाहतो तर पंपू कुत्रा ती ओढत होता.

‘‘पंपू, फाटंल नं पँट..’’ पंपू नंदूला अलीकडेच सापडला होता. कन्स्ट्रक्शन साइटवरच्या वाळूच्या ढिगाऱ्यावर पहुडलेला – भुकेनं कण्हत. नंदूनं त्याला प्रेमानं खाऊ-पिऊ घातलं तसं पंपू त्याचा जिगरी दोस्तच बनला. पंपू नंदूला साइटच्या गेटपर्यंत ओढत घेऊन गेला. तिथे नंदूला एक पाकीट पडलेलं दिसलं – पत्र्याच्या मेणाच्या पणत्यांचं. त्यानं इथं-तिथं पाहिलं.

‘‘आर्र्र, सकाळी त्यो पणत्या इक्नारा ग्येला हितून. त्याचंच पडलं दिसतंय कोपऱ्यात.’’ नंदू घेऊ-की-नको ठरवेपर्यंत पंपू ते तोंडात धरून घराच्या दिशेनं पळाला. मग नंदूनंही रांगोळीभोवती पणत्या सुबकपणे रचल्या. अंधार पडू लागला तसं त्यानं आकाशकंदील लावला. देवापुढचा दिवा आणि इतर पणत्याही लावल्या. तो पणती विकणारा उद्या दिसला की बाबांना त्याला त्या पणत्यांचे पैसे द्यायला तो सांगणार होता.

‘‘व्वा! नंदू, घर लई भारी दिसतंय- कंदील, पणत्या, फुलांची रांगोळी..’’ मंगलकाकी लक्ष्मीला ओवाळण्यासाठी ताट घेऊन आली होती.

‘‘बग नं, या फुलांची आन् पंपूची कशी मदत झाली काकी.’’

‘‘जनू त्यांनी तू केलेली मदत ध्येनात ठेवली..’’

‘‘म्हंजी?’’ नंदूला समजेना.

‘‘काई न्हाई पोरा..’’ म्हणत काकीनं नंदूचा गालगुच्चा घेतला.

इतक्यात रिक्षेचा आवाज आला. लक्ष्मीला घेऊन आई-बाबा आले होते. नंदू खूश झाला. त्याच्या तोंडून आपसूकच उमटलं.. ‘‘घर माजं सजलं रांगोळी-दिव्यांनी, आन लक्षिमी घरा आली सोन्या-मोत्यांच्या पावलांनी..’’

mokashiprachi@gmail.com

एकामेकां फस्त करू

फराळाचे पदार्थ सारे
बसले होते ताटात
प्रत्येक जण बसला होता
वेगवेगळय़ा थाटात

चकली बोलली, ‘माझ्या मनात
विचार आलाय एक
रागावणार नसाल तुम्ही तर
बोलू का मी थेट?’

सगळे म्हणाले, ‘घाबरू नकोस
बोलायचं ते बोल
मन तुझं बिनधास्तपणे
आमच्यापाशी खोल’

चकली म्हणाली, आपल्याला
माणसं आवडीने खातात
आपण जातो पोटात अन्
ते जिभल्या चाटत ऱ्हातात

आपण कधीच एकामेकांना
चाखून नाही पाह्यलं
कोणाची चव कशी असते
ते बघायचंच राह्यलं

आज आपण एकामेकांनाच
थोडं थोडं खाऊ
कोण किती चांगला आहे
सांगत आपण राहू

चकलीने खाल्ला लाडू अन्
लाडवाने शेव चाखला
चिवडा खाऊन बघण्यासाठी
अनारसा मग वाकला

ताटात सगळे इकडून तिकडे
फिरत होते मस्त
एकामेकांनाच हळूहळू
करत होते फस्त

आई रागावली
रिकामं ताट पाहून
तिला वाटलं बंडूच सगळं
गुपचूप गेला खाऊन

हाका ऐकून आईच्या
बंडू धावत आला
आल्याआल्या आईकडून
पाठीत धपाटा खाल्ला

-डॉ. सतीश अ. कानिवदे