साहित्य : कार्डपेपर, कात्री, गम, पुठ्ठा, स्केचपेन, फुटपट्टी, पेन्सिल इ.
कृती : कार्डपेपरची ६ इंच बाय १३ इंचाची आडवी आयताकृती पट्टी कापून घ्या. स्केचपेनने साधेसेच उभ्या रेषांचे डिझाइन काढा. या घडीवर साधारण अर्धा इंचावर फॅनफोल्ड (एक दुमड आत व एक दुमड बाहेरील बाजूस झिगझॅग आकारासाठी मारतात तशी ) मारून घ्या. पुढील व सर्वात मागील घडी एकमेकांवर उभ्या बाजूने पूर्णपणे चिकटवा. एक दंडगोल झिगझॅग आकार तयार होईल. या दंडगोलाच्या खालील बाजूस साधारण १ इंचावर पुन्हा दुमडा व आतील बाजूस ढकलून घ्या (मार्जिनसारखे). पुठ्ठय़ाचा साधारण हा दंडगोल व्यवस्थित उभा राहील अशा आकाराचा चौकोन कापा. वाटल्यास त्यावर दंडगोलाच्या विरुद्ध रंगाचा कार्डपेपर चिकटवा. या चौकोनावर दंडगोलाचे कापलेले १ इंचाचे मार्जिन खालील बाजूस फेव्हिकॉल लावून पुठ्ठय़ाच्या चौकोनावर चिकटवा. झाली आपली झटपट कागदी फुलदाणी तयार. त्यात कागदी फुले ठेवा.
कागदी फुलदाणी
साहित्य : कार्डपेपर, कात्री, गम, पुठ्ठा, स्केचपेन, फुटपट्टी, पेन्सिल इ. कृती : कार्डपेपरची ६ इंच बाय १३ इंचाची आडवी आयताकृती पट्टी कापून घ्या. स्केचपेनने साधेसेच उभ्या रेषांचे डिझाइन काढा.
आणखी वाचा
First published on: 15-10-2012 at 12:36 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifil archana joshi paper vaas