साहित्य : कार्डपेपर, कात्री, गम, पुठ्ठा, स्केचपेन, फुटपट्टी, पेन्सिल इ.
कृती : कार्डपेपरची ६ इंच बाय १३ इंचाची आडवी आयताकृती पट्टी कापून घ्या. स्केचपेनने साधेसेच उभ्या रेषांचे डिझाइन काढा. या घडीवर साधारण अर्धा इंचावर फॅनफोल्ड (एक दुमड आत व एक दुमड बाहेरील बाजूस झिगझॅग आकारासाठी मारतात तशी ) मारून घ्या. पुढील व सर्वात मागील घडी एकमेकांवर उभ्या बाजूने पूर्णपणे चिकटवा. एक दंडगोल झिगझॅग आकार तयार होईल. या दंडगोलाच्या खालील बाजूस साधारण १ इंचावर पुन्हा दुमडा व आतील बाजूस ढकलून घ्या (मार्जिनसारखे). पुठ्ठय़ाचा साधारण हा दंडगोल व्यवस्थित उभा राहील अशा आकाराचा चौकोन कापा. वाटल्यास त्यावर दंडगोलाच्या विरुद्ध रंगाचा कार्डपेपर चिकटवा. या चौकोनावर दंडगोलाचे कापलेले १ इंचाचे मार्जिन खालील बाजूस फेव्हिकॉल लावून पुठ्ठय़ाच्या चौकोनावर चिकटवा. झाली आपली झटपट कागदी फुलदाणी तयार. त्यात कागदी फुले ठेवा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifil archana joshi paper vaas