बालमित्रांनो, गाण्यातील अंताक्षरीचा खेळ तुम्ही नेहमीच खेळता. आज आपण शब्दभेंडय़ा हा खेळ खेळू या. बघा तुम्हाला आवडतो का? शब्दभेंडय़ा नावातूनच आपल्याला कळेल की पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरातून दुसरा शब्द सुरू होणार आहे. वरील कोडय़ात दाखवलेले बाण हे शब्द लिहिण्याची दिशा दर्शवितात.
सूचक शब्द
१. तारकासमूह, तारकामंडळ
२. जमिनीखाली वाढणारी एक नारिंगी रंगाची भाजी
३. स्तंभ, वर्तमानपत्रातील उभा छेद
४. श्रावण महिन्यातील एक सण
५. विश्लेषण, पृथक्करण
६. स्पर्धा, आयोजित केलेला खेळ
७. छापाकाटा
८. गोष्ट
९. शास्त्रीय नृत्याचा एक प्रकार
१०. कप्तान, संघनायक
११. नस, शीर
१२. शंकराचे एक नाव
१३. आरोप, दोषारोपण
१४. विधि, अधिकृत नियम
१५. मसाल्यातील एक पदार्थ
१६. पाणी, जल
१७. रद्दबातल
१८. मामलेदार
१९. जगन्नाथाच्या मूर्तीची यात्रा ‘——’ यातून केली जाते.
२०. एखाद्याकडूल येणे असलेले पैसे
२१. किडा
२२. चतुराई
२३. तातडीने, लागलीच, तडकाफडकी
२४. विवाहाच्या मुहूर्ताची वेळ
२५. कर्तृत्व
२६. त्या काळचा
२७. व्यायाम, मेहनत
२८. पोटफुगी
२९. गहन, पृष्ठभागापासून खूप खाली
३०. ताल, ठेका
३१. सफलता
उत्तरे :
१. आकाशगंगा २. गाजर ३. रकाना ४. नागपंचमी ५. मीमांसा ६. सामना ७. नाणेफेक ८. कथानक ९. कथ्थक १०. कर्णधार ११. रक्तवाहिनी १२. नीलकंठ १३. ठपका १४. कायदा १५. दालचिनी १६. नीर १७. रहित १८. तहसीलदार १९. रथ २०. थकबाकी २१. कीटक २२. कल्पकता २३. तात्काल २४. लग्नघटिका २५. कार्यक्षमता २६. तात्कालिक २७. कसरत २८. तडस २९. सखोल ३०. लय ३१. यश