आई, आई
कुठं गेली?
दूरवरच्या
नद्या-नाली.
नद्या-नाली
कशासाठी?
हंडाभर
पाण्यासाठी.
नद्या-नाले
गेले सुकून
आई आली
थकून-भागून.
थकल्या-भागल्या
आईसाठी
झाडं लावा
नदीकाठी.
झाडं लावता
मेघ झरतील
नद्या-नाले
झुळझुळ गातील.