‘‘मी हरीश वाघ. तुमचा नवीन वर्गशिक्षक. तुम्हाला इतिहास आणि ड्रॉइंग शिकवणार आहे.’’ पहिल्या तासाला रोल-कॉल झाल्यानंतर सर फळ्यावर त्यांचं नाव लिहीत म्हणाले. ते पुढे काही म्हणणार तितक्यात कुणीतरी वाघाची एक मोठी डरकाळी काढली. सगळा वर्ग हसू लागला. सगळ्यांबरोबर सरही दिलखुलास हसले. सर कुणालाही न ओरडता हसले हे पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटलं. वर्ग एकदम गप्प झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘‘आपल्या वर्गात कुणी नकलाकार दिसतोय. मलाही आवडेल त्याला भेटायला.’’ सर त्यांचा जाड फ्रेमचा चष्मा सारखा करत म्हणाले. त्यावर काही मुलं अनवधानाने शेवटच्या बाकाच्या दिशेने बघू लागली. बाकाखाली लपून बसलेला शंतनू वर्तक नाइलाजाने बाहेर आला आणि जागेवर उभा राहिला. तो खोडय़ा, टवाळक्या करण्यात शाळेत एकदम प्रसिद्ध होता. सर काही म्हणायच्या आत तो वर्गाबाहेर चालू लागला.
‘‘काय रे, कुठे निघालास?’’ सरांनी आश्चर्याने विचारलं.
‘‘मी आवाज करतोय हे समजल्यावर तुम्ही मला वर्गाबाहेर नक्कीच काढणार! त्यापेक्षा माझा मीच जातो. तुमचा त्रास कमी. सगळे शिक्षक हेच तर करतात.’’ शंतनू अरेरावीपणे म्हणाला.
‘‘मी अजून असं काहीच म्हणालो नाहीये. जा, जागेवर जाऊन बस. अजून कुणाकुणाच्या नकला करतोस रे?’’
‘‘मस्करी करताय का माझी?’’
‘‘नाही, खरंच विचारतोय.’’
‘‘काही प्राणी-पक्ष्यांचे आवाज काढता येतात मला.’’ सरांच्या सांगण्यावरून शंतनूने चिमणी, हत्ती, टिटवी, सिंह असे बरेच आवाज काढून दाखवले. सर दिलखुलास दाद देत होते. ते पाहून अख्ख्या वर्गाने टाळ्या वाजवल्या. शंतनूलाही हुरूप आला. कारण कुठले शिक्षक त्याचं असं पहिल्यांदाच कौतुक करत होते.
दुसऱ्या दिवशी सर वर्गावर आले तेव्हा फळ्यावर एका भिंगाचा काळा चष्मा घातलेल्या वाघाचं कार्टून काढलेलं होतं. कार्टूनमधला वाघ एका खुर्चीवर बसला होता. त्याच्या एका हातात पुस्तक होतं आणि एका हातात छडी. काल सरांनी एका कोपऱ्यात लिहिलेलं त्यांचं नाव दिवसभरात पुसलं न गेल्यामुळे अजून तिथेच होतं. वाघापासून त्यांच्या नावापर्यंत एक बाण काढला होता.
‘‘मस्त आहे चित्र. कुणी काढलं?’’ सर कार्टून न्याहाळत म्हणाले. कुणीच काही बोलेना. सरांनी मग सगळ्या मुलांवर एक नजर फिरवली. शंतनू वहीत डोकं खुपसून काहीतरी खरडताना त्यांना दिसला.
‘‘शंतनू, छान काढलंयस चित्र. तू खरोखरच अवलिया आहेस. किती कला आहेत तुझ्यात!’’
‘‘सर, तुम्हाला कसं समजलं?’’ शंतनूने दचकून वर पाहिलं आणि जागेवरच उभा राहत विचारलं.
‘‘अनुभव! फक्त तुझ्या चित्रात एक चूक आहे. ही छडी वगरे आपल्याला नको. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये नेहमी मत्रीचं नातं हवं. बाकी कार्टून एकदम फर्स्ट क्लास!’’
‘‘सर, सॉरी.. सर.. थँक यू..’’ शंतनूला काहीच सुचेना. सरांनी त्याच्या जवळ येऊन एका मित्रासारखी त्याची पाठ थोपटली.
‘‘सर, तुम्हाला हेडमास्तर बोलावतायत केबिनमध्ये. त्या शंतनूचा काहीतरी लफडा झालाय पुन्हा.’’ त्याच दिवशी मोठय़ा सुटीनंतरच्या तासाला रामू शिपाई वाघ सरांच्या दुसऱ्या कुठल्या वर्गावर निरोप द्यायला आला.
‘‘रामू, भाषा नीट वापर की! शाळा आहे ही! चल लवकर.’’
सर हेडमास्तरांच्या केबिनमध्ये आले तेव्हा शंतनू एका कोपऱ्यात मान खाली घालून उभा होता. त्यांच्या वर्गाला गणित शिकवणाऱ्या साठेबाई हेडमास्तरांसमोर बसल्या होत्या. त्या रडकुंडीलाच आल्या होत्या.
‘‘काय झालंय सर?’’ वाघ सरांनी विचारलं.
‘‘या शंतनूने मॅडमचं कार्टून काढून टेबलावर ठेवलं होतं. त्यांनी ते पाहिलं आणि त्या भडकल्याच. त्यातच त्या वर्गात शिरताना त्याने चिमणीचा आवाज काढला आणि सगळा वर्ग हसला. वर्गामध्ये आधी कुणीच काही बोलायला तयार होईना. पण सगळ्यांची तक्रार करणार म्हटल्यावर शंतनूने स्वत:च ही खोडी केल्याची कबुली दिली. आता याच्या वर्गाला शिकवणार नाही म्हणतात मॅडम.’’ हेडमास्तरांनी ते कार्टून वाघ सरांना दाखवलं. त्यांनी शंतनूकडे एक कटाक्ष टाकला आणि ते कार्टून हेडमास्तर आणि साठेबाईंच्या परवानगीने स्वत:कडे ठेवून घेतलं.
‘‘हे पहिल्यांदा नाहीये सर. त्याच्याबद्दल सारख्या तक्रारी येतात सगळ्याच शिक्षकांकडून. तुम्ही इथे नवीन आहात त्यामुळे तुम्हाला अजून माहिती नाहीये, की तुम्हालाही आला त्याच्या खेडय़ांचा प्रत्यय’’ हेडमास्तर वैतागून म्हणाले.
‘‘नाही सर. तसं काहीच झालं नाही. उलट, सगळ्यांशी आता छान ओळख झालीये माझी.’’ हे ऐकून शंतनूने वाघ सरांकडे चमकून पाहिलं. त्याला वाटलं होतं की त्यांच्याबाबतीत घडलेला प्रकार सर आता नक्की हेडमास्तरांना सांगणार.
‘‘लकी आहात तुम्ही सर. हे सगळे माझ्या बारीक आवाजामुळे मला ‘चिमणी चिमणी’ म्हणून चिडवतात. या मुलांच्या शाळेत शिकवायचं म्हणजे कर्मकठीण..’’ साठेबाई लहानसा हुंदका देत म्हणाल्या.
‘‘शेवटचं माफ करा त्याला सर. पुन्हा असं होणार नाही याची जबाबदारी मी घेतो.’’ वाघ सर आश्वस्त करत म्हणाले म्हणून हेडमास्तरांनी नाइलाजाने शंतनूला सोडून दिलं.
त्याच दिवशी संध्याकाळी वाघ सरांनी रामू शिपायाकरवी शंतनूला शाळा सुटल्यानंतर स्टाफ रूममध्ये येण्याचा निरोप पाठवला.
‘‘बस, बस. आधी सांग, तू घरी कसा जातोस? स्कूल बस वगरे..’’ शंतनू स्टाफ-रूममध्ये आल्यावर सर म्हणाले.
‘‘सायकलने.’’ स्टाफ-रूममध्ये आता ते दोघेच होते.
‘‘थोडा वेळ थांबू शकशील? मला बोलायचंय तुझ्याशी.’’
‘‘हो सर! आज हेडमास्तरांच्या केबिनमध्ये तुम्ही माझ्यासाठी खोटं..’’
‘‘कारण मला तुझ्यात एक क्षमता दिसते शंतनू. दुर्दैवाने तुझ्यातले गुण तू स्वत:च ओळखू शकला नाहीयेस. तुझी ही वेगवेगळे आवाज किंवा कार्टून्स काढण्याची कला, ही ऊर्जा यांचा चांगल्या प्रकारे वापर व्हायला हवा. असं शिक्षकांची चिडवाचिडवी करून, त्यांना त्रास देऊन तू काय मिळवतोस? हेडमास्तरांनी तुला यामुळे सस्पेंड केलं तर त्याचा परिणाम तुझ्या शिक्षणावर आणि पुढच्या आयुष्यावर काय होईल याचा विचार केला आहेस का कधी?’’
‘‘त्या साठेबाई एकदम बंडल शिकवतात. काहीच समजत नाही. गेल्या आठवडय़ात एक अख्खं गणित चुकीचं शिकवलं त्यांनी. मी त्यांची चूक दाखवून दिली तर सरप्राइज टेस्टमध्ये मुद्दाम कमी मरक दिले मला. म्हणून मी..’’ शंतनूने वाक्य अर्धवट सोडलं.
‘‘हे एक झालं. मग इतर शिक्षक का तक्रार करतात? आणि तुझ्या खोडय़ांमुळे वर्गातल्या इतर मुलांना त्रास नाही का होत?’’
‘‘हे लक्षातच आलं नाही सर.’’ शंतनू मान खाली घालत म्हणाला.
‘‘हे पहा, शिक्षकांचं काही खटकत असेल तर हेडमास्तरांना जाऊन सांग. कधीही काहीही वाटलं तर माझ्याशी निर्धास्तपणे येऊन बोल. चिडवाचिडवी करणं, त्रास देणं हे त्यावरचं उत्तर नव्हे. मुळात शांत हो! स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न कर. तू खूप गुणी मुलगा आहेस. एवढं करशील माझ्यासाठी?’’
‘‘प्रयत्न करीन सर! गॉड प्रॉमिस!’’ सरांचं बोलणं शंतनूच्या मनाला भिडलं आणि खरोखरच त्यानंतर शंतनूबद्दलच्या तक्रारी येणं कमी झालं.
‘‘वाघ सर, येऊ का?’’ इतिहासाचा तास सुरू असताना हेडमास्तर तिथे आले.
‘‘शंतनू, इथे ये बघू!’’ हेडमास्तरांनी बोलावल्यावर शंतनू थोडा बिचकतच पुढे आला.
‘‘अभिनंदन तुझं! आपल्या शाळेचं नाव काढलंस तू!’’ हेडमास्तरांनी त्याची पाठ थोपटली. शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत शंतनूला आणि ओघाने शाळेला पहिलं पारितोषिक मिळालं होतं. म्हणून हेडमास्तर स्वत:हून त्याचं कौतुक करायला आले होते. आज साठेबाईंपासून सगळेच शिक्षक शंतनूचं भरभरून कौतुक करत होते. त्यामुळे शंतनू अगदी भारावून गेला होता.
‘‘सरांनी आग्रह धरला आणि मार्गदर्शन केलं म्हणून मी स्पर्धेत भाग घेऊ शकलो.’’ वाघ सरांकडे बघत शंतनू कृतज्ञतेने म्हणाला.
‘‘शंतनू, मी फक्त तुला एक नवी दिशा दिली. तिच्यावरची वाटचाल आता तुझ्या हातात आहे.’’
mokashiprachi@gmail.com