बालमित्रांनो, आपण बोलताना कित्येक सजीव किंवा देवांचा उल्लेख त्यांच्या शारीरिक वैशिष्टय़ांनुसार करतो. तुम्हाला ‘अ’ गटात संख्यात्मक शारीरिक विशेषणे व ‘ब’ गटात त्यावरून ओळखले जाणारे सजीव/ देव यांची नावे दिलेली आहेत. त्यांच्या जोडय़ा तुम्हाला लावायच्या आहेत. चला तर, करा सुरुवात!
गट अ :
एकदंत, एकशिंगी, एकाक्ष, द्विरद, द्विजिव्ह, त्रिलोचन, चतुरानन, चतुर्भुज, पंचानन, षडानन, षटपद, अष्टपद, दशानन, शतपदी
गट ब :
ब्रह्मा, विष्णू, शंकर, गणपती, कार्तिकेय, रावण, कावळा, हत्ती, सर्प, सिंह, कोळी,
गोम/ घोण, गेंडा, भ्रमर.    
उत्तरे :
१) एकाक्ष- कावळा २) एकदंत- गणपती
३) त्रिलोचन- शंकर ४) द्विरद- हत्ती
५) द्विजिव्ह- सर्प ६) चतुरानन- ब्रह्मा
७) पंचानन- सिंह, शंकर ८) षडानन- कार्तिकेय ९) दशानन- रावण १०) अष्टपद-कोळी ११) षटपद- भ्रमर १२) चतुर्भुज- विष्णू १३) शतपदी- गोम, घोण १४) एकशिंगी- गेंडा