दारासमोर रांगोळी आणि दरवाजाला फुलांचे तोरण बांधून सणाचे स्वागत करण्याची आपली संस्कृती आहे. ‘महाराष्ट्र दिन’ हादेखील आपण सण म्हणूनच साजरा करतो. त्यानिमित्ताने आज शब्दांचे तोरण बनवणार आहोत. तोरणात शब्द भरण्यासाठी तुम्हाला सूचक अर्थ दिलेले आहेत. शब्दांचे तोरण तयार झाल्यावर प्रत्येक शब्दातील पहिले अक्षर घेऊन महाराष्ट्राविषयी अभिमान व्यक्त करणाऱ्या गीताची पहिली ओळ तयार होते. ती ओळ घेऊन या गीताचे ध्रुवपद पूर्ण करा.
yotsna.sutavani@gmail.com
सूचक माहिती :
१) नानाविध सोंगे धारण करून समाजप्रबोधन करणारे कलावंत. २) देशासाठी बलिदान करणारा, शहीद. ३) मानवाच्या मूलभूत गरजांपकी एक. ४) किल्ला किंवा महत्त्वाच्या वास्तूंभोवती असणारी संरक्षक िभत. ५) कान/नाक टोचल्यावर घालायचे सोन्याच्या तारेचे वेटोळे. ६) सन्यातील विभाग. ७) जवाहीर. ८) तीळगूळ वाटून साजरा करण्याचा सण. ९) मराठवाडय़ातील एक जिल्हा. १०) पोपट. ११) शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली ती पुण्यातील प्रसिद्ध वास्तू म्हणजे लाल —. १२) युद्ध किंवा खेळ यात — ही आलीच.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा