साहित्य : तीन मेणबत्या, एक काचेचा ग्लास, एक खोलगट ताटली/ बशी, काडेपेटी, ग्लासभर रंगीत पाणी, रबर बँडस्.
कृती : प्रथम ताटलीच्या मध्यभागी एक मेणबत्ती ठेवा आणि ताटली पूर्ण भरेल
एवढे रंगीत पाणी ताटलीत ओतून घ्या.
आता मेणबत्ती पेटवून त्यावर काचेचा ग्लास उपडा ठेवा.
उपडय़ा ग्लासमध्ये ऑक्सिजन असेपर्यंत मेणबत्ती जळेल आणि ऑक्सिजन संपला की मेणबत्ती विझेल आणि ताटलीतील थोडे पाणी ग्लासमध्ये वर चढलेले दिसेल. पाण्याची पातळी मार्क करण्यासाठी ग्लासला रबरबँड लावून घ्या.
आता हाच प्रयोग दोन मेणबत्त्या लावून करून बघा. यावेळी आधीपेक्षा थोडे जास्त पाणी ग्लासमध्ये चढलेले दिसेल. पाण्याची ही पातळीदेखील रबरबँडच्या साहाय्याने मार्क करून ठेवा.
आता तीन मेणबत्त्या घेऊन हा प्रयोग करून बघा. पुन्हा दुसऱ्या पातळीपेक्षा जास्त पाणी ग्लासमध्ये चढलेले दिसेल.
एका मेणबत्तीवर ग्लास उपडा केला किंवा तीन मेणबत्त्यांवर ग्लास उपडा केला तरी ग्लासमधील ऑक्सिजनचे प्रमाण तेवढेच असणार आहे. त्यामुळे मेणबत्त्यांची संख्या वाढली तरी पाण्याची पातळी सारखीच राहिली पाहिजे. परंतु प्रत्यक्षात मेणबत्त्यांची संख्या वाढली की पाण्याची पातळी वाढते.
असे का होत असेल बरे?
जेव्हा मेणबत्त्यांची संख्या वाढते तेव्हा त्या मेणबत्त्यांनी ग्लासमधील काही आकारमान आधीच व्यापलेले असते. ग्लासातल्या हवेतील असलेला २१ टक्के ऑक्सिजन ज्वलनासाठी वापरला गेल्यावर ती जागा व्यापण्यासाठी पाणी जेव्हा वर चढते त्यावेळी दोन किंवा तीन मेणबत्त्यांचे आकारमान अधिक ऑक्सिजनचे आकारमान हे पूर्वीपेक्षा जास्त असल्यामुळे पाणी आणखी वपर्यंत चढलेले दिसते.
या प्रयोगाचा व्हिडिओ तुम्ही या लिंकवर
बघू शकता -https://www.youtube.com/watch?v=yeKRp8gdTi0
(याच्याशी थोडेसे साधम्र्य असलेली इसापनीतीतील तहानलेल्या कावळ्याची
गोष्ट आठवा. माठातील पाणी वर येण्यासाठी हुशार कावळ्याने त्यात दगड टाकले.
आपण या प्रयोगात मेणबत्त्यांची संख्या वाढवली.)
मनाली रानडे manaliranade84@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा