श्रीनिवास बाळकृष्णन

मोठ्ठे कितीही वैतागत, रागावत असले तरी कार्टून म्हणजे आपला जीव की प्राण! आपल्या आई-बाबांना माहीतच नाही, की काही कार्टून्स ही त्यांच्या आई-बाबांच्या, त्यांच्याही आई-बाबांपेक्षा जुनी आहेत.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
father son emotional video
“जेव्हा प्रेम आणि कर्तव्य दोन्ही समोर असतात”, मुंबईतील रेल्वेस्थानकावरील ‘हा’ VIDEO पाहून कळेल बापाची माया काय असते

‘काटूर्नगाथा’ या सदरात अशाच जगभरातल्या कार्टून्सशी ओळख करून घेणार आहोत. यात आपलं कार्टून कसं तयार झालं हे तर पाहणारच आहोत, पण ती काढायची कशी हेदेखील कधीकधी शिकणार आहोत.

मित्रांनो, हे मोठ्ठे आपल्याला कार्टून पाहून देत नसले तरी कार्टून विश्वापासून आपल्याला कोणी तोडू शकत नाही. चला तर मग, आजचं कार्टून पाहुयात !

फंटास्मागोरी (Fantasmagorie) हे जगातील सर्वात जुने (अ‍ॅनिमेशन) कार्टून मानले जाते. पूर्वी संगणक नव्हते म्हणून सर्वच (कार्टून) चित्रे ही हातानेच काढली जायची आणि अ‍ॅनिमेशन (चलचित्र) म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, की अनेक चित्रे वेगात सरकवली की हलती होतात. इथं प्रत्येक चित्र हाताने काढत ही पहिली छोटी कार्टून फिल्म बनलीये.

आता जरी आपल्याला मोठय़ा आकाराच्या कार्टून मालिका आवडतात तरी १९०८ वर्षी अशी दीडेक मिनिटांची कार्टून फिल्म बनणं हीदेखील क्रांतीच होती. त्याआधी १९०६ ला डोळे, ओठ, हलविणारे मख्खं चेहऱ्याचं अनिमेशन झालं खरं, पण ते पाहून तुम्हाला अजिबात हसूबिसू आलं नसतं.

ही फिल्म फ्रेंच कार्टूनिस्ट एमिले कोहल (emile cohl) यांनी तयार केली होती. याचे समस्त बच्चे कंपनीवर खूप उपकार असल्याने चला बच्चेलोक, आधी यांना साष्टांग दंडवत घालून पुढे वाचू या.

..तर या कार्टूनमध्ये दोन गमती करणारी मुख्य कॅरॅक्टर आहेत. एकावर एक अशी दोन वर्तुळं ठेवून, हातापायाच्या काडय़ा असलेली ही धडपडी माणसं. केवळ काळ्यावर पांढऱ्या रेषेतून काय काय धमाल होऊ  शकते हे तुम्हाला युटय़ूबवर पाहता येईल. पण यात गंमत म्हणजे, चित्रकाराने सुरुवातीला स्वत:चे हातही फिल्ममध्ये दाखवून आपल्याला क्लियर केलंय की तुम्ही पाहताय ते चित्रच आहे.

उगाच कॅरेक्टर वगैरे नाही, पण धमाल आहे. जणूकाही त्याने स्पर्श केल्या केल्या ती रेषा जिवंत झाली.

फंटास्मागोरी नंतर कोहल यांनी ‘द पपेट्स नाइटमेअर’ आणि ‘द लव्ह अफेअर इन टॉयलँड!’ अशी कार्टून फिल्म्स अमेरिका आणि ब्रिटनसाठी बनवल्या.

तुम्ही युटय़ूबवर गेलाच तर तुम्हाला आवडलेले काही कार्टून्स एपिसोड मला सुचवू शकता. मला त्यावर गप्पा मारायला जाम आवडतं.

Chitrapatang@gmail.com

Story img Loader