विज्ञान प्रयोग करायला आणि काहीतरी नवीन उपकरणे बनवायला अनेकांना आवडतं. तसेच टाकाऊ वस्तू वापरून टिकाऊ व अत्यंत उपयुक्त, नाविन्यपूर्ण अशी वस्तू बनविता आली तर मजाच! म्हणूनच पुढे दिलेली विजेरी (टॉर्च) अवश्य बनवा. यासाठी तुम्हाला पुढील साहित्य लागेल.
१) २०० ग्रॅम टूथपेस्टचे रिकामे कव्हर व बूच
२) ३४ मिलीमीटर व्यासाची सुमारे १४ मि.मि. जाडीची लाकडाची चकती (डिस्क). (एखादा लाकडी दांडू करवतीने कापून गोल चकती बनवता येते. )
३) शंकूच्या आकाराची अंदाजे १० मि.मि. उंचीची िस्प्रग.
४) मिक्सर-ग्राईंडर, ड्रिल मशीन इ. विद्युत उपकरणात कार्बन ब्रशच्या मागे वापरतात ती कॉपर प्लेटेड आयर्न िस्प्रग (ती न मिळाल्यास बॉलपेन मधील िस्प्रग चालेल.)
५) १० मि.मि. व्यासाचा पांढरा प्रकाश देणारा एल.ई.डी. (लाईट एमिटिंग डायोड)
६) प्लास्टिकचे आवरण असलेली काळी वीजवाहक तार (फ्लेक्झीबल वायर)
७) स्विच (ऑन/ऑफ स्लायिडग)
८) १.५ व्होल्ट चे दोन मोठे सेल (1050 फ 20)
९) १५ मि.मि. ७ ५ मि.मि. तांब्याची अथवा पितळ्याची पातळ पट्टी.
टॉर्च बनविण्यापूर्वी पुढील गोष्टी नीट समजाऊन घ्या.
एल.ई.डी. ला दोन तारा असतात. एक अ‍ॅनोड व दुसरी कॅथोड (सामान्यत: लांब तार अ‍ॅनोड असते) एल.ई.डी.च्या अ‍ॅनोडला ३ व्होल्ट बॅटरीचे धन (+) टोक व कॅथोडला ऋण (-) टोक जोडल्यास तो प्रकाशमान होतो. उलट जोडणी केल्यास प्रकाश पडणार नाही.
विद्युत जोडणी व्यवस्थित, टिकाऊ होण्यासाठी सॉल्डर करणे हा उत्तम मार्ग. सॉल्डर चांगले व्हायला हवे असेल तर सर्व पृष्ठभाग ब्लेडने/चाकूने नीट घासून साफ केले पाहिजेत. यासाठी जाणकारांकडून मार्गदर्शन घेणेच योग्य. सॉल्डिरग करणे शक्यच नसेल तर विद्युत जोडणी तारा पिळून, पक्कडने दाबून करता येते. वरून चिकटपट्टी ((Insulation tape) लावून जोड सुरक्षित करा.
कृती :     १) रिकाम्या टूथपेस्ट कव्हरचा तळाकडील सपाट भाग कात्रीने कापून टाका. कव्हर आणि बूच स्वच्छ धूवून कोरडे करा. २) टूथपेस्टच्या बुचाला वरच्या बाजूने आतील तळाला साधारण मध्यभागी एक बारीक भोक पाडा व दुसरे भोक कडेच्या गोलाकार पृष्ठभागाला पाडा. पहिल्या भोकातून एल.ई.डी. चा अ‍ॅनोड व दुसऱ्या भोकातून कॅथोड घालून दोन्ही तारा हलकेच खेचून घ्या. एल.ई.डी. बुचामध्ये बसवून टाका. बाहेरून कडेने सेलोटेप लाऊन एल.ई.डी.हलणार नाही अशी सोय करा. ३) अ‍ॅनोडला एक िस्प्रग योग्य तेवढी कापून जोडा. जोड नोजप्लायरने घट्ट दाबून टाका. (येथे सॉल्डर करू नका. बूच वितळण्याचा धोका आहे.) ४) गोल लाकडी चकतीला एका सपाट पृष्ठभागावर मध्यभागी एक बारीक भोक पाडा. एक छोटी पितळी/तांब्याची पट्टी (१५ मि.मि. ७ ५ मि.मि.) मधोमध भोक पाडून त्या लाकडी चकतीवर स्कूने घट्ट बसवा. (आकृती १) नंतर एक शंकूच्या आकाराची छोटी िस्प्रग या पट्टीवर बसवून पट्टी दोन्ही टोकांना वळवून दाबून टाका, जेणेकरून िस्प्रग लाकडावर घट्ट बसेल (आकृती २). ५) या पितळी पट्टीला काळी प्लास्टिक कोटेड तांब्याची तार सॉल्डर करून घ्या. ही तार रिकाम्या टूथपेस्ट कव्हरच्या आतून वर आणा व बुचाजवळच्या उतरत्या भागाला भोक पाडून त्यातून बाहेर काढून स्विचच्या एका टोकाला सॉल्डर करा. स्विचच्या दुसऱ्या टोकाला एल.ई.डी.चा कॅथोड तांब्याची जोड तार वापरून सॉल्डर करा. एल.ई.डी.सॉल्डर करताना विशेष काळजी घ्या. (तार जास्त गरम झाली तर एल.ई.डी. चे आतील जंक्शन वितळून जाते.) ६) आता दोन मोठे सेल (१.५. व्होल्ट प्रत्येकी) टूथपेस्ट कव्हरच्या आत योग्य दिशेने खालून (+ / –) लाकडी चकती कव्हरच्या तळाशी आतमध्ये घट्ट बसवा (आकृती ३). यासाठी दोन बाजूंनी बारीक भोक पाडून छोटे स्क्रू पिळता येतील. नाहीतर सेलोटेपने घट्ट चिकटवले तरी चालेल, जेणेकरून सेल मधील ऊर्जा संपली तर सेल सहजपणे बदलता येतील. स्विच बाहेरच्या बाजूवर सेलोटेपने घट्ट बसवा (आकृती ३).
या टॉर्चचे फायदे : १) हे सेल खूप महिने चालतात. कारण एल.ई.डी. प्रकाशमान होण्यासाठी फार कमी विद्युत प्रवाह लागतो. ३ व्होल्ट बॅटरीवर पांढरा एल.ई.डी. लावल्यास सुमारे १० मिलीअ‍ॅम्पियर विद्युत धारा वाहते. या उलट टंगस्टन फिलामेंट बल्ब वापरला तर २०० ते ५०० मिलीअ‍ॅम्पियर विद्युत धारा वाहते व सेल लवकर संपतात. २) एल.ई.डी गरम होत नाहीत. त्यामुळे उष्णतेच्या रूपात ऊर्जा वाया जात नाही. ३) प्रकाश मंद पडत असला तरी संपूर्ण अंधारात ३ ते ४ मीटर अंतरावरील वस्तूसुध्दा नीट दिसतात. ४) पर्यावरण प्रेमी, स्वस्त आणि मस्त टॉर्च! छोटा ९ व्होल्टचा सेल (6ा 22) वापरून सुध्दा छोटी टॉर्च बनवता येते. फक्त या टॉर्चमध्ये एल.ई.डी. बरोबर ३३० ओहमचा विद्युत रोध एकसर जोडणीत वापरणे अत्यावश्यक आहे. चूकून सुध्दा एल.ई.डी. डायरेक्ट ९ व्होल्टला जोडू नका, कारण विद्युत धारा मर्यादित न केल्याने आतील जंक्शन वितळून जाते (आकृती ४).
या टॉर्चमध्ये स्विच ऐवजी काढा-घालायचा कनेक्टर वापरता येईल. जुन्या संपलेल्या ९ व्होल्ट सेलचा वरील भाग कापून त्याला लाल व काळी वायर सॉल्डर करून छानसा कनेक्टर बनवता येतो.

Story img Loader