साहित्य : मिठाईचा रिकामा खोका, हिरवा कार्डपेपर, पुठ्ठा, स्केचपेन, औषधाच्या बाटल्यांची बुचे, थर्माकोलचे छोटे गोळे, कापूस, गम, कात्री, कटर, पेन्सिल, हिरवी क्रेपटेप इ.
कृती : हिरव्या रंगाच्या कार्डपेपरवर ख्रिसमस ट्रीचे २ अकार काढून घ्या व ते पुठ्ठय़ावर चिकटवा. दोन्ही बाजूने हिरवा कागद लावा. जाड गडद हिरव्या रंगाच्या स्केचपेनने (बॉर्डर) ठळक रेषा करून घ्या. व्यवस्थित आकारात कापून घ्या. एका भागावर खालपासून वपर्यंत पातळ चीर मारून कापा. आता दोन्ही झाडांचे आकार एकमेकांत गुंतवा व गमने चिकटवून घ्या. झाला तुमचा ख्रिसमस ट्री तयार.औषधाच्या बाटल्यांची बुचे क्रेप टेपने गुंडाळा. दुसऱ्या हिरव्या कार्डपेपरच्या गुंडाळ्या करून त्यावर चिकटवा व लांब काडय़ांची टोके कात्रीने जवळजवळ कापून उंच पामची झाडे बनवा. काही छोटी झाडे बुचांच्या कुंडय़ांसाठी बनवून त्यात चिकटवा. मिठाईच्या रिकाम्या खोक्यामध्ये ख्रिसमसचे झाड असलेली कुंडी चिकटवा. बाजूला कापसाची गादी बनवा. त्यावर वेगवेगळे थर्माकोलचे रंगीत गोळे लावून सजवा. झाडांनासुद्धा रंगीत गोळ्यांनी सजवा आणि ख्रिसमसमध्ये आपल्या टिपॉय किंवा टेबलची शोभा वाढवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा