साहित्य – कार्डपेपर, दोन आईस्क्रीमच्या काडय़ा, कात्री, गम, कटर, स्केचपेन, रबर बॅण्डस्, पोस्टर कलर्स, ब्रश इ. साहित्य.
कृती – साधारण ५.५ से. मी. त्रिज्येचे वर्तुळ हार्डबोर्डवर कंपासाने काढा व मध्यावर +  चिन्हाची खूण करा.
दोन आईस्क्रीमच्या काडय़ांना मध्यापर्यंत चीर द्या. आधी पेन्सिलने रेष काढून घ्या आणि कात्री किंवा कटरने मध्यापर्यंत कापा. दोन्ही काडय़ा एकमेकांमध्ये अडकवा व गमने चिकटवा. दोन्ही टोकांना रबरबॅण्डने तात्पुरते बांधा व पूर्ण वाळल्यावर काढून टाका. हार्डबोर्डचे वर्तुळ कार्डपेपरवर ठेवून चकती कापा व छायाचित्राप्रमाणे रंग आणि रेषा काढा. कार्डपेपरची रंगीत चकती हार्डबोर्डच्या चकतीला ‘+’ चिन्हाच्या विरुद्ध बाजूस चिकटवा. ‘+’  चिन्हावर कटरने चीर द्या. आईस्क्रीमच्या एकमेकांत चिकटवलेल्या काडय़ा या ‘+’  चिन्हाच्या चिरेमध्ये सरकवा. आपली रंगीत भिंगरी झाली तयार गोल गोल फिरायला; जणू काही विनादोरीचा भोवराच.
या भिंगरीमुळे तुम्ही गतीचा प्रयोग व रंगांची किमया एकत्रितपणे सिद्ध करू शकता.

Story img Loader