खालील चौकटी बघून तुम्ही गोंधळला तर नाहीत ना? नेहमीचेच शब्दकोडे आहे. फक्त या शब्दकोडय़ात एक गंमत अशी आहे, की प्रत्येक शब्द तीन अक्षरीच असणार आहे. तो उलटसुलट कसाही वाचला तरी तो सारखाच राहणार आहे. उदाहरणार्थ गाडगा. इंग्रजीत याला palindrome असे म्हणतात.
आडवे शब्द:
१. सैन्य, कंकण
३. शाबासकी, स्तुती
४. नूतन
५. एक फळभाजी
६. गव्हाचे पीठ
७. कापणारा
९. नृत्य
११. बुरशी
१४. तारतम्य न बाळगता, सरसकट
१६. वंदन
१८. श्रेष्ठ, उत्तम
२०. सात स्वरांपैकी चौथ्या स्वराचे नाव
२२. धान्यातील न शिजणारा दाणा
२३. अध्र्यार् च्या संयोगाने होणारे जोडाक्षर उदा. र्ग
२४. वनस्पती तूप
२५. गलबत
उभे शब्द
१. टणक, जहाल
२. सोने
३. अनिश्चितपणा, शंका, कमतरता
७. काळिमा
८. एक नृत्य प्रकार
९. कमळ
१०. डोळा
१२. वृष्टी
१३. प्राणी व कसरती करणाऱ्या लोकांचा खेळ १४. कसदार, पौष्टिक
१५. जोडशब्द, लेखाच्या बाजूस कागदावर सोडतात ती कोरी जागा.
१७. जखमेवर लावण्याचा लेप
१९. एक प्रकारच्या झाडाच्या चिकापासून होणारा पदार्थ
२१. युरोपियन स्त्री
२३. रेडिओ लहरींद्वारे आकाश, पृथ्वीवरील वस्तूचे स्थान संगणकासारख्या पडद्यावर दाखवणारी यंत्रणा.
८ ८ ज्योत्स्ना सुतवणी
उत्तर: